2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला डिजिटली कनेक्ट करणार

By admin | Published: September 13, 2016 05:50 PM2016-09-13T17:50:00+5:302016-09-13T18:26:20+5:30

2018 पर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात फायबर कनेक्विव्हिटी करण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना व्यक्त केला आहे

By 2018, digitally connecting entire Maharashtra | 2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला डिजिटली कनेक्ट करणार

2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला डिजिटली कनेक्ट करणार

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पायाभूत सुविधांचा विकास कमीत कमी वेळात साधला जाऊ शकतो. यामुळे लोकांचं आयुष्य बदलेल. डिजिटल क्रांतीमुळे महाराष्ट्राचं रुप बदलेल. 2018 पर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात फायबर कनेक्विव्हिटी करण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना व्यक्त केला आहे. 
 
स्त्यांचा दर्जा हा तुमच्या विकासाचा मार्ग असतो असं अटलजी सांगायचे. चांगले रस्ते संधी उपलब्ध करुन देतात. सध्या 6 लाख गावे एकमेकांना जोडली आहेत. पण पंतप्रधानांना प्रत्येक गावाला डिजिटलच्या माध्यमातून जोडायचे आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 
 
 
महाराष्ट्रात 6 हजार किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. नितिन गडकरींच्या मध्यस्थी आणि सहकार्यामुळे आता त्याची व्याप्ती 22 हजार किमीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे माल वाहतूकीचा वेगही खूप वाढेल. किमान 10 वर्ष तरी रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही याची काळजी घेण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
 
(अच्छे दिन गले की हड्डी बन गयी है - नितिन गडकरी)
(1 जानेवारीपासून बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात - नितीन गडकरी)
 
गेल्या 8 ते 10 वर्षापासून 8 मंजु-या अडकून होत्या, पण मोदींनी व्हिडिओमध्येच मंजुरी देऊन टाकली. 7 मंजु-या एका दिवसात आणि शेवटची सात दिवसांमध्ये, ही मोदींची काम करण्याची पद्दत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
 
पुणे विमानतळाचा कायापालट करण्यात येणार असून लवकरच हे स्वप्न सत्यात उतरेल. तसंच डिसेंबर 2019 मध्ये नवी मुंबई विमानतळावरुन पहिलं विमान उड्डाण करेल याची खात्री मी देतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
 
किमान 10 जिल्ह्यांना विमानतळाच्या माध्यमातून जोडण्याचा संकल्प असून यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. यामुळे 60 ते 10 टक्के महाराष्ट्र विमान सेवेच्या माध्यमातून जोडला जाईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 
 
राज्यातील 10 हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प गेल्या 15 वर्षापासून प्रलंबित आहेत. पुढील 3 वर्षात हे प्रकल्प पुर्ण करणार आहोत यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सहमती दर्शवली आहे. वर्धा - यवतमाळ - नांदेडप्रमाणे अनेक प्रलंबित प्रकल्प होते. एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली. मात्र फंडिंग न मिळाल्याने प्रकल्प प्रलंबित राहिले. आता असं होणार नाही. आम्ही हे प्रकल्प पुर्ण करुन रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्गम भागांना जोडणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
 
काम करणा-या अधिका-यांच्या बाजूने जेव्हा तुम्ही उभे राहता, त्यांना सक्षम बनवता तेव्हा ते उत्साहाने काम करतात. ते तज्ञ आहेत मी नाही अशी प्रांजळ कबुली  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 
 

Web Title: By 2018, digitally connecting entire Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.