२०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 08:16 PM2023-11-11T20:16:27+5:302023-11-11T20:17:50+5:30

चेतन दळवी, निशिगंधा वाड यांना चित्रपट विभागातील पुरस्कार. सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा. 

2023Lata Mangeshkar Award announced to veteran singer Suresh Wadkar Maharashtra government | २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

२०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. दरम्यान, २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री   सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार इत्यादी पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी देण्यात येतात.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत पुरस्काराच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय पुरस्कारांच्या क्षेत्रांमध्येही विस्तार करण्यात आला आहे.

२०२३ चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेशजी वाडकर यांना जाहीर झालेला आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो. तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार २०२२ साठी पं. उल्हासजी कशाळकर यांना, तर २०२३ च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांतजी (नाना) श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी अतुलनीय योगदान दिले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२२ साठी श्रीमती सुहासिनीजी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे, तर २०२३ साठी अशोकजी समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे. मराठी रंगभूमीवर ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, अशा कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

पुरस्कार विजेत्यांची नावं पुढीलप्रमाणे

गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
सुरेशजी वाडकर (२०२३)

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
सुहासिनी देशपांडे (२०२२)
अशोक समेळ (२०२३)

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार
नयना आपटे (२०२२)
पं. मकरंदजी कुंडले (२०२३)

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार
पं. उल्हास कशाळकर (२०२२)
पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळ्ये (२०२३)

राज्य सांस्कृतिक पुरस्कार

नाटक
वंदनाजी गुप्ते (२०२२)
ज्योती सुभाष (२०२३)

उपशास्त्रीय संगीत
मोरेश्वर निस्ताने (२०२२)
ऋषिकेश बोडस (२०२३)

कंठ संगीत
अपर्णा मयेकर (२०२२)
रघुनंदन पणशीकर (२०२३)

लोककला
हिरालाल रामचंद्र सहारे (२०२२)
 कीर्तनकार भाऊरावजी थुटे महाराज (२०२३)

शाहिरी
जयंत अभंगा रणदिवे (२०२२)
राजू राऊत (२०२३)

नृत्य
लताजी सुरेंद्र (२०२२)
सदानंदजी राणे (२०२३)

चित्रपट
चेतन दळवी (२०२२)
निशिगंधा वाड (२०२३)

कीर्तन प्रबोधन
प्राची गडकरी (२०२२)
अमृत महाराजजी जोशी (२०२२)

वाद्य संगीत
पं. अनंतजी केमकर (2022)
शशिकांत सुरेश भोसले (2023)

कलादान
संगीताजी राजेंद्र टेकाडे (२०२२)
यशवंत रघुनाथ तेंडोलकर (२०२३)

तमाशा
बुढ्ढणभाईजी बेपारी (वेल्हेकर) (२०२२)
उमाजी खुडे (२०२३)

आदिवासी गिरीजन
भिकल्या धाकल्या धिंडा (२०२२)
सुरेश नाना रणसिंग (२०२३)

Web Title: 2023Lata Mangeshkar Award announced to veteran singer Suresh Wadkar Maharashtra government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.