ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये सायबरची 21 केंद्रे कार्यान्वित

By admin | Published: August 15, 2016 08:06 PM2016-08-15T20:06:41+5:302016-08-15T20:06:41+5:30

राज्यभरात 42 ठिकाणी सुरू होणा:या सायबर लॅबपैकी ठाणो ग्रामीण पोलीस आयुक्तालय या दोन्ही ठिकाणी या लॅब कार्यान्वित झाल्याने दोन्ही ठिकाणच्या 21 वर्क स्टेशन्सच्या माध्यमातून

21 centers of cyber running in Thane city and rural | ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये सायबरची 21 केंद्रे कार्यान्वित

ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये सायबरची 21 केंद्रे कार्यान्वित

Next

ऑनलाइन लोकमत
ठाणे : राज्यभरात 42 ठिकाणी सुरू होणा:या सायबर लॅबपैकी ठाणो ग्रामीण पोलीस आयुक्तालय या दोन्ही ठिकाणी या लॅब कार्यान्वित झाल्याने दोन्ही ठिकाणच्या 21 वर्क स्टेशन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक सायबर गुन्हे उघडकीस आणणे शक्य होणार आहे, अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते सायबर लॅबचे उद्घाटन झाले, त्या वेळी ते बोलत होते.

या सायबर लॅबच्या माध्यमातून ह्यहार्ड डिस्क फॉरेन्सिकह्ण त्याचप्रमाणो मोबाइल फॉरेन्सिक तपास सहज शक्य होणार आहे. योग्य तंत्रज्ञानाअभावी असे गुन्हे उघडकीला आणणो शक्य होत नव्हते, अशी माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली. तसेच ती अधिक सुसज्ज बनवण्यासाठी आणखीही दीड कोटी रु पयांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

13 वर्क स्टेशन्स..
पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या तिस:या मजल्यावर ही सुसज्ज सायबर लॅब असून 13 केंद्रे या ठिकाणी आहेत. संपूर्ण वातानुकूलित अशी ही सायबर लॅब तांत्रिक तपासासाठी सुसज्ज आहे. एवढेच नव्हे तर चौकशी अधिकारी आणि सायबर लॅबमधील तंत्नज्ञ यांना संवादासाठी स्वतंत्न कॉन्फरन्सही या ठिकाणी आहे. तपासणीचे हार्डवेअर सुरक्षित राहण्यासाठी आगप्रतिबंधक स्टोअरेजदेखील आहे. या सायबर लॅबकरिता आवश्यक असलेले सॉफ्टवेअर आणि प्रशिक्षण दिले आहे. तर, ठाणो ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातही तिस:या मजल्यावर ही सायबर लॅब आहे. या ठिकाणीदेखील आठ वर्क स्टेशन्स आहेत.

या सायबर लॅबमध्ये विनालिफ्ट, नेसा, सायबर चेक, मोबाइल चेक, एडविक असे आधुनिक पद्धतीचे सॉफ्टवेअर असून यात हार्डडिस्क इमेजिंग, मोबाइल फोन इमेजिंग, डम्प डाटा विश्लेषण, सीडीआर, टॉवर सीडीआर विश्लेषण, सोशल मीडियावर निरीक्षण शक्य होणार आहे.

या वेळी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांचा यासंदर्भातील संदेश वाचून दाखवला. उद्घाटनास खासदार राजन विचारे, डॉ श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर संजय मोरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ग्रामीण पोलीस अधीक्षक महेश पाटील, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 21 centers of cyber running in Thane city and rural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.