मेहकर तालुक्यात वीज पडून २१ मजूर जखमी
By Admin | Published: August 30, 2014 11:52 PM2014-08-30T23:52:06+5:302014-08-30T23:52:29+5:30
मेहकर तालुक्यातील शिवपूरी शिवारात वीज पडून २१ मजूर जखमी.
मेहकर (जि. बुलडाणा) : शेतात काम करुन एकत्रपणे जांभळाच्या झाडाखाली जेवायला बसलेल्या मजुरांच्या अंगावर वीज पडल्याने २0 जण जखमी तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शिवपूरी शिवारात ३0 ऑगस्ट रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, सर्व जखमींना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मौजे बरटाळा येथील पुंडलिक शंकर गायकवाड यांच्या शिवपूरी शिवारातील शेतात काही मजूर काम करीत होते. दुपारी जेवणासाठी सर्व मजूर जांभळाच्या झाडाखाली एकत्रीत बसले. त्याचवेळी विजेचा कडकडाट होऊन झाडाखाली बसलेले ७ पुरूष व १४ महिला अशा एकुण २१ मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. त्यामध्ये पुंडलिक गायकवाड हे गंभीर जखमी झाले. लक्ष्मीबाई नागनाथ आव्हाळे (६0), रुख्मिनी रमेश खंदारे (२५), लता सुभाष बोरकर (३५), भगवान लक्ष्मण अंभोरे (४५), भरत प्रकाश नाडे (२२), विद्या भगवान अंभोरे (१६), उषा भरत नाडे (१८), संगिता गोपाल नाडे (२२), छाया विठ्ठल गायकवाड, सगुना दादाराव नाडे (३५), संगिता भगवान अंभोरे (३५), द्वारका किसन इंगळे (६५), जिजाबाई नामदेव नाडे (६५), सुशमा नंदा अंभोरे (२५), पंचफुला गजानन नाडे (२५), गणेश दादाराव नाडे (१५), सोनु सुभाष बोरकर (१७), गजानन भगवान अंभोरे (१६), गजानन हरिभाऊ नाडे (२७) व सत्यभामा हरिभाऊ नाडे (६0) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.