परभणीत ४२० मजुरांच्या नावावर उचलले २१ कोटी, त्रिधारा शुगर्सचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 06:28 AM2017-08-28T06:28:48+5:302017-08-28T06:29:08+5:30

परभणी तालुक्यातील आमडापूर येथील त्रिधारा शुगर्स कारखान्याने ४२० मजुरांच्या नावावर प्रत्येकी ३ लाख रुपयांचे कर्ज उचलून २० कोटी ८० लाखांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

21 million raised in the name of 420 laborers in Parbhani, and treble of tridhara sugars | परभणीत ४२० मजुरांच्या नावावर उचलले २१ कोटी, त्रिधारा शुगर्सचा प्रताप

परभणीत ४२० मजुरांच्या नावावर उचलले २१ कोटी, त्रिधारा शुगर्सचा प्रताप

Next

विजय चोरडिया 
जिंतूर (जि. परभणी) : परभणी तालुक्यातील आमडापूर येथील त्रिधारा शुगर्स कारखान्याने ४२० मजुरांच्या नावावर प्रत्येकी ३ लाख रुपयांचे कर्ज उचलून २० कोटी ८० लाखांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यापूर्वी गंगाखेड येथील एका खासगी साखर कारखान्याने शेतकºयांच्या नावे असेच कर्ज परस्पर उचलले आहे.
त्रिधारा साखर कारखान्याचे संचालक तहसीन अहेमद खान यांनी कारखान्यामध्ये काम देण्याचे अमिष दाखवून तर कुणाला कारखान्याचे सभासद करून घेतो, असे म्हणत मजुरांच्या कर्ज मागणीपत्रावर स्वाक्षºया घेतल्या. त्या आधारे जवळा बाजार येथील ( जि. हिंगोली) भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून प्रत्येक मजुरांच्या नावे ३ लाख रुपयांचे कर्ज उचलले. बँकेने कर्ज वसुलीसाठी वकिलामार्फत मजुरांना नोटिसा पाठविल्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संचालक तहसीन अहेमद खान यांनी जवळा बाजार येथील बँकेला मजुरांना ऊस तोडणीसाठी बैलगाडी खरेदी, बैलगाडी दुरुस्ती, मजुर भरती, ऊस वाहतूक आदींसाठी म्हणून कागदपत्रे दिली होती. या आधारेच बँकेने १० आॅक्टोबर २०१३ रोजी एकाच वेळी सर्वांच्या खात्यावर कर्ज जमा केले. जवळा बाजार येथील भारतीय स्टेट बँकेने कर्जदाराची परतफेड करण्याची क्षमता, कर्ज हमी व कार्यक्षेत्र न पाहता कारखान्याचे मजूर असलेले दाखवित कर्ज वाटप केले. यामध्ये परभणीसह, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, वाशीम आदी जिल्ह्यातील मजुरांना बैलगाडी खरेदी, ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी कर्ज दिले. कर्ज देत असताना कारखान्याने बँकेला मालमत्ता गहाण ठेवली. बँकेने कर्ज देताना कामगारांची मजुरी त्यातून कर्जाचे हप्ते, फेडण्यास किती रक्कम भरेल? याचे ताळेबंद कारखान्याकडून घेतले. कामगारांच्या कुटुंबाला लागणारा नियमित खर्च प्रती दिन १५० रुपये धरला, तर कामगाराकडून व्याजासहीत दरमहा ३ हजार ५१० रुपये हप्ता म्हणून सहज वसुली होऊ शकते, असा करारनामा बँकेने लिहून घेतला.


तडजोडीचे प्रयत्न सुरू
यासंदर्भात भारतीय स्टेट बँकेच्या जवळा बाजार शाखेचे प्रभारी व्यवस्थापक प्रकाश मुकाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, त्रिधारा शुगरच्या अनुषंगाने न्यायालयामध्ये खटला सुरु आहे. शिवाय वरिष्ठ पातळीवर तडजोडीचे प्रयत्न सुरु आहेत. थकित कर्जाची रक्कम भरण्याबाबत वन टाईम सेटलमेंट स्कीम अंतर्गत ज्या शेतकºयांच्या नावे कर्ज आहे, त्यांना बँकेच्या वतीने कर्ज भरण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत.

Web Title: 21 million raised in the name of 420 laborers in Parbhani, and treble of tridhara sugars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.