बारावीचा २१.५९ टक्के निकाल

By admin | Published: November 18, 2015 02:17 AM2015-11-18T02:17:06+5:302015-11-18T02:17:06+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्फे सप्टेंबर-आॅक्टोबर २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २१.५९ टक्के लागला असून निकालात गत वर्षीपेक्षा यंदा

21.59 percent of HSC results | बारावीचा २१.५९ टक्के निकाल

बारावीचा २१.५९ टक्के निकाल

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्फे सप्टेंबर-आॅक्टोबर २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २१.५९ टक्के लागला असून निकालात गत वर्षीपेक्षा यंदा ५ टक्क्यांनी घट झाली आहे.
औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून मुंबई विभागचा निकाल सर्वात कमी आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ७६ हजार २७० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते.त्यातील १६ हजार ४६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना २० नोव्हेंबरला गुणपत्रिकांचे वाटप महाविद्यालयात केले जाईल.
आॅक्टोबर २०१४ मध्ये २६.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा हा टक्का घसरून २१.५९ टक्का इतका झाला आहे. (प्रतिनिधी)

विभागीय मंडळ टक्केवारी
पुणे१९.९३
नागपूर२३.८२
औरंगाबाद३६.२५
मुंबई१७.९२
कोकण२०.२०

Web Title: 21.59 percent of HSC results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.