२१ मार्चला शिवतीर्थावर चमत्कार घडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2017 02:53 AM2017-03-07T02:53:36+5:302017-03-07T02:53:36+5:30

सेना भवनात उद्धवजींना शब्द दिला होता की, कोणत्याही परिस्थितीत रायगडाच्या शिवतीर्थावर भगवा फडकवूच व त्या ईर्षेनेच उतरलो होतो.

On 21st March, miracles will happen on Shivtirth | २१ मार्चला शिवतीर्थावर चमत्कार घडेल

२१ मार्चला शिवतीर्थावर चमत्कार घडेल

Next


नागोठणे : निवडणुकीपूर्वी सेना भवनात उद्धवजींना शब्द दिला होता की, कोणत्याही परिस्थितीत रायगडाच्या शिवतीर्थावर भगवा फडकवूच व त्या ईर्षेनेच उतरलो होतो. मात्र, द. रायगडमध्ये जसे यश मिळाले तसे उ. रायगडात अपेक्षित यश मिळाले नसल्याने आपण भगवा फडकवू शकलो नाही याची मला निश्चितच खंत आहे. जिल्हा परिषद कोणाच्या हातात जाईल हे आजही गुलदस्त्यातच असून विरोधी पक्षांचे नेते आजही संपर्कात असल्याने २१ मार्चच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीही चमत्कार घडेल असे सूचक विधान केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केले.
रायगड जिल्हा शिवसेना आणि ऐनघर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी विभागातील सुकेळी येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ आणि विजयी मेळावा पार पडला त्यावेळी गीते बोलत होते. या कार्यक्र माला शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, आ. मनोहर भोईर, आ. भरत गोगावले, जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई, रवी मुंडे, जिल्हा सल्लागार तथा नवनिर्वाचित जि. प. सदस्य किशोर जैन, सुरेंद्र म्हात्रे, माजी आ. तुकाराम सुर्वे, विजय कवळे आदींसह जि. प. चे १८ आणि पं. स. ४२ चे नवनिर्वाचित सदस्य तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
रायगडमध्ये शिवसेनाच मतांमध्ये प्रथम क्र मांकावर राहिली आहे व २०१९ च्या निवडणुकीची ही नांदीच आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातून १०० टक्के आमदार निवडून देण्यासाठी शिवसैनिकांनी आजपासूनच कामाला लागावे असा संदेश देताना नवनिर्वाचित सदस्यांनी तडजोड हा शब्द यापुढे आयुष्यात कधीही न काढता जनतेसाठी आपण निवडून आलो आहोत हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कामाला लागावे असा मोलाचा सल्ला आदेश बांदेकर यांनी दिला. या कार्यक्र मात जि. प. आणि पं. स. च्या नवनिर्वाचित सदस्यांचा गीते आणि आदेश बांदेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
रायगडमध्ये शिवसेनाच मतांमध्ये प्रथम क्र मांकावर राहिली आहे व २०१९ च्या निवडणुकीची ही नांदीच आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातून १०० टक्के आमदार निवडून देण्यासाठी शिवसैनिकांनी आजपासूनच कामाला लागावे असा संदेश आदेश बांदेकर यांनी दिला.

Web Title: On 21st March, miracles will happen on Shivtirth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.