महाडच्या दुर्घटनेतील २२ मृतदेह सापडले

By Admin | Published: August 6, 2016 05:35 AM2016-08-06T05:35:42+5:302016-08-06T05:35:42+5:30

सावित्री पूल दुर्घटनेत वाहून गेलेल्या वाहनांमधील बेपत्ता प्रवाशांचा शोध सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील युद्धपातळीवर सुरू होता.

22 bodies have been found in Mahad accident | महाडच्या दुर्घटनेतील २२ मृतदेह सापडले

महाडच्या दुर्घटनेतील २२ मृतदेह सापडले

googlenewsNext


महाड : सावित्री पूल दुर्घटनेत वाहून गेलेल्या वाहनांमधील बेपत्ता प्रवाशांचा शोध सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील युद्धपातळीवर सुरू होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत यापैकी २२ मृतदेह हाती लागले आहेत. तर, गुरुवारी एका पत्रकाराला धमकी दिल्याबद्दल गृहनिर्माणमंत्री व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महाडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मात्र अन्य बेपत्ता प्रवाशांचा शोध लागत नसल्याने नातेवाईकांची चिंता वाढतच चालली आहे. एका वृत्तवाहिनीच्या वार्ताहराला धमकी तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी प्रकाश मेहता यांच्याविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: 22 bodies have been found in Mahad accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.