‘तो’ अमली पदार्थ २२ कोटींचा!

By admin | Published: March 10, 2015 11:05 PM2015-03-10T23:05:03+5:302015-03-11T00:11:32+5:30

धर्मराजला कोठडी : जिल्ह्यात प्रथमच ११३ किलो ‘एमडीएम’ सापडल्याने पोलीस ‘अलर्ट’

22 million! | ‘तो’ अमली पदार्थ २२ कोटींचा!

‘तो’ अमली पदार्थ २२ कोटींचा!

Next

खंडाळा/सातारा : खंडाळा तालुक्यातील कण्हेरी गावात सोमवारी ताब्यात घेण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल २२ कोटी ४० लाख ९१ हजार रुपये असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘मेथॅड्रॉन’ असे मूळ नाव असलेला हा अमली पदार्थ नशाबाजांमध्ये ‘एमडीएम’ नावाने परिचित आहे. कण्हेरी येथे पकडलेल्या साठ्याचे वजन ११३ किलो भरले आहे. दरम्यान, हा साठा ज्याच्या घरात सापडला, त्या धर्मराज बाहुराव काळोखे या मुंबईच्या हवालदाराला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मुंबईसारख्या महानगरांमध्ये ‘एमडीएम’ या नावाने तरुणवर्गात ओळखला जाणारा अमली पदार्थ सातारा जिल्ह्यात प्रथमच सापडल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यानेच हा साठा बाळगल्याचे समोर आल्याने अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. यामागे मोठी टोळी सक्रिय आहे का? पोलीस हवालदार धर्मराज बाबूराव काळोखे (वय ५२) याचे नशेचा व्यापार करणाऱ्या साखळीतील नेमके स्थान कोणते? जिल्ह्यात ‘एमडीएम’ची छुपी विक्री सुरू झाली आहे का? असल्यास या साखळीतील अन्य दुवे कोणते? अशा अनेक प्रश्नांभोवती तपासयंत्रणा फिरते आहे. धर्मराज काळोखेचे मूळ गाव कण्हेरी असून, त्याने आपल्या शेजाऱ्याच्या घरी पाच बॅगा ठेवण्यासाठी दिल्या होत्या. त्यासाठी त्याने संबंधिताला कपाट खरेदी करण्यासाठी काही पैसे दिले होते, असेही उघड होत आहे. त्याचे मुंबईत तीन घरे आहेत. त्याच्याकडे ‘एमडीएम’चा एकंदर ३०० किलो साठा असावा, अशी प्राथमिक माहिती होती. ती खरी असल्यास उर्वरित साठ्याचे त्याने काय केले, हेही शोधावे लागणार आहे. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाची गुंतागुंत शोधून प्रत्येक धागा तपासण्याच्या मागे लागली आहे.
सोमवारी काळोखे घरी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. त्याने मुंबईहून आणलेल्या पाच बॅगा शेजाऱ्याकडे ठेवण्यास दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या ताब्यात घेण्यात आल्या होत्या. काळोखे हा मुंबईच्या मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेत हवालदार म्हणून कार्यरत आहे.
अंमली पदार्थांच्या तस्करांशी त्याचा संबंध कसा आला आणि ही साखळी कुठून निघून कुठपर्यंत पोचली आहे, याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक दीपक हुंबरे, गुन्हे
शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट, निरीक्षक अशोक शेवाळे
याप्रकरणी दिवसभर कसून तपास करीत होते.


काळोखे दहा दिवसांच्या रजेवर
हवालदार काळोखे दहा दिवसांच्या रजेवर होता आणि या काळात तो कोकण, गोवा, महाबळेश्वर, आदी ठिकाणी फिरत होता, असे तपासात पुढे आले आहे. तो या सर्व ठिकाणी केवळ फिरण्यासाठी गेला होता की अमली पदार्थांशी संबंधित ही भटकंती होती, याचा शोध पोलीस घेत आहेत.



काय आहे ‘एमडीएम’
मूळ नाव ‘मेथॅड्रॉन’- साखरेसारखे पारदर्शक स्फटिक अंमली पदार्थांमध्ये समावेश करण्याची अधिसूचना फेब्रुवारीत जारी बाळगण्यास, सेवन करण्यास सोपा असल्याने महानगरांमधील तरुणांमध्ये नशेसाठी सर्वाधिक वापर जिभेवर ठेवताच जीभ चरचरते शीतपेयात मिसळून सहजपणे सेवन करता येणारा घातक अमली पदार्थ

इस्लामपुरात २० कोटींचे अंमली मेफेड्रॉम हस्तगत / वृत्त ५

Web Title: 22 million!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.