२२ नगरसेवकांच्या ‘डीपी’वर हरकती
By admin | Published: May 14, 2017 01:53 AM2017-05-14T01:53:38+5:302017-05-14T01:53:38+5:30
विकास नियोजन आराखड्याच्या मसुद्यावर कळकळ व्यक्त करीत अभ्यासासाठी राज्य सरकारकडून दोनवेळा नगरसेवकांनी मुदतवाढ मिळवली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विकास नियोजन आराखड्याच्या मसुद्यावर कळकळ व्यक्त करीत अभ्यासासाठी राज्य सरकारकडून दोनवेळा नगरसेवकांनी मुदतवाढ मिळवली. मात्र या कालावधीत केवळ २२ नगरसेवकांनी विकास आराखड्यावर सुचना व हरकती नोंदवल्या आहेत.
सन २०१४-२०३४ या वीस वर्षांचा विकास आराखडा गेली दोन वर्षे मंजुरीसाठी रखडला आहे. काही शिफारशींमुळे वादग्रस्त ठरलेल्या आराखड्यात सुधारणा करण्यात आल्या. महापालिका निवडणुकीच्या काळात हा आराखडा लांबणीवर टाकण्यात आला. १९ मार्चपर्यंत मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविण्यात येणारा हा आराखडा दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला.
या काळात नगरसेवकांच्या मागणीनुसार पालिका प्रशासनाने चारवेळा आराखड्याचे सादरीकरण केले. मात्र त्यानंतर १०९ नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विशिष्ट तक्रारी आणल्या. त्यातही २२ नगरसेवकांनी सुचना व हरकती नोंदवल्या.