संजय गांधी निराधार योजनेचे 22 हजार लाभार्थी वंचित
By admin | Published: October 17, 2014 01:54 AM2014-10-17T01:54:24+5:302014-10-17T01:54:24+5:30
वयाची साठी गाठल्यावर हक्काने व सन्मानपूर्वक जगण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक विभागाकडून महिन्याला अनुदान दिले जाते.
Next
अमोल सोटे ल्ल आष्टी (श़) (वर्धा)
वयाची साठी गाठल्यावर हक्काने व सन्मानपूर्वक जगण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक विभागाकडून महिन्याला अनुदान दिले जाते. या हक्काच्या मानधनाला दप्तरदिरंगाईचा फटका बसत आह़े यामुळे गत 4 महिन्यांपासून लाभार्थी वंचित आहेत़ वर्धा जिल्ह्यात 22 हजार 315 लाभार्थी वंचित असल्याचे माहिती अधिकार कायद्यातून उघड झाले आह़े
ज्येष्ठ व वयोवृद्ध पात्र लाभार्थी पोस्टातून मानधन उचलत होते. यात काही ठिकाणी गडबड झाल्याने राष्ट्रीयीकृत बॅँकांमार्फत खाते उघडण्यात आले. जिल्हास्तरावरून एका एजन्सीला लाभाथ्र्याना मानधन वाटपाचे कंत्रट देण्यात आले आहे. संबंधित एजन्सीचालक अरेरावीचे धोरण अवलंबित असल्याने लाभाथ्र्याच्या खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब होतो आहे. दिवाळी आठ दिवसांवर आहे. तत्पूर्वी मानधन मिळेल, अशी आशा लाभाथ्र्याना आहे. रोज बॅँकेत व पोस्टात जाऊन ‘साहेब माङो मानधन जमा झाले काय,’ असा प्रश्न ते विचारत आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ वृद्धापकाळ योजना या दोन्हींमध्ये लाभाथ्र्याचा भरणा अधिक आहे. मानधनापासून सर्वच तालुक्यांतील लाभार्थी वंचित आहेत़ मानधन त्वरित न मिळाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे मत निराधार व्यक्त करीत आहेत़ दिवाळीपूर्वी मानधन मिळाल्यास सण साजरा करण्यास हातभार लागणार आहे.
निराधार वृद्धांचे सण त्यांना मिळणा:या मानधनावरच अवलंबून असतात़ शासकीय तसेच खासगी कर्मचा:यांनाही दिवाळीपूर्वी वेतन व बोनस दिला जातो; पण संजय गांधी निराधार योजनेतील लाभाथ्र्याना चार महिन्यांपासून अनुदानच देण्यात आले नाही़ यामुळे लाभाथ्र्यामध्ये असंतोष पसरला आह़े
च्शासकीय तसेच खासगी कर्मचा:यांनाही दिवाळीपूर्वी वेतन व बोनस दिला जातो; पण संजय गांधी निराधार योजनेतील लाभाथ्र्याना चार महिन्यांपासून अनुदानच देण्यात आले नाही़ यामुळे लाभाथ्र्यामध्ये असंतोष पसरला आह़े