उजनीत २२ हजार क्युसेकने विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 02:11 PM2019-07-09T14:11:52+5:302019-07-09T14:40:25+5:30

पुण्यातील पावसाचा परिणाम; उजनी धरणात आत्तापर्यंत केवळ चार टक्के पाणी आले

Up to 22 thousand cusecs | उजनीत २२ हजार क्युसेकने विसर्ग

उजनीत २२ हजार क्युसेकने विसर्ग

googlenewsNext
ठळक मुद्देउजनी धरणातील पाणी पातळी ही नीचांकी असून वजा ५४.३४ टक्के अशी स्थिती आज आहेभीमा खोºयातील धरणांवर म्हणजेच मावळ भागात व भीमाशंकर परिसरात जोरदार पावसास सुरुवात झालीयंदाच्या पावसाळ्यात उजनी धरणात आत्तापर्यंत केवळ चार टक्के पाणी आले आहे

भीमानगर :  भीमा खोºयातील धरणांवर म्हणजेच मावळ भागात व भीमाशंकर परिसरात जोरदार पावसास सुरुवात झाली असून, उजनीच्या वरील धरणांमध्येही वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असल्याने दौंडजवळून या धरणात रविवारी रात्रीपासून २५ हजार क्युसेक पाणी मिसळत होते. सोमवारी सायंकाळी ६ वाजता २२ हजार ५५ क्युसेकने विसर्ग सुरूच आहे यामुळे पाणी पातळी वाढणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरणात आत्तापर्यंत केवळ चार टक्के पाणी आले आहे.

उजनी धरणातील पाणी पातळी ही नीचांकी असून वजा ५४.३४ टक्के अशी स्थिती आज आहे. पावसाळा सुरू होताना हे धरण वजा ५९.८० टक्के होते. यात केवळ आता सव्वाचार टक्के पाण्याची आवक झाली आहे. हे धरण क्षमतेने भरण्यासाठी दीडशे टक्के प्रवास करावा लागणार आहे. जून महिन्यात पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस असतो; मात्र यंदा मान्सूनने उशिरा आगमन केल्याने पर्जन्याचे गणित बिघडले आहे. मध्यंतरी भीमा खोºयात चांगला पाऊस झाला; मात्र नंतर त्याने विश्रांती घेतली होती यामुळे चिंतेचे वातावरण होते. मागील चोवीस तासात वरुणराजा पुन्हा बरसू लागला असून, भीमा व नीरा खोºयात पुन्हा चांगल्या जलसाठ्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील चोवीस तासात घोड उपखोºयातील माणिकडोहवर ३६ मि.मी, डिंभे ४५ तर भीमा खोºयातील कलमोडी २०, भामा २२, वडिवळे ७५, पवना ६६, वरसगाव ८५, टेमघर १२४, मुळशी ११९, पानशेत ८४, खडकवासला २५ मि.मी. अशी पावसाची नोंद आहे. दरम्यान, भीमा व नीरा खोºयात पावसाचे प्रमाण कमी आहे. धरणही नीचांकी असल्याने आषाढी वारीसाठी भीमा नदीत पाणी सोडता आलेले नाही. गुंजवणी प्रकल्पावर १४५ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे तर नीरा देवधरवर ७७ मि.मी.ची नोंद आहे. भाटघरवर २० तर वीर ९ मि.मी. पर्जन्यमान झाले आहे.

उजनीची स्थिती.........

  • एकूण पाणी पातळी        ४८५.७००
  • एकूण पाणीसाठा         ९७८.३४ दलघमी
  • उपयुक्त पाणीसाठा वजा     ८२४.४७ दलघमी
  • धरण वजा             ५४.३४ टक्के 
  • एकूण टीएमसी         ३४.५५
  • उपयुक्त टीएमसी वजा         २९.११ टीएमसी
  • दौंडमधून विसर्ग         २२ हजार ५५ क्युसेक

Web Title: Up to 22 thousand cusecs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.