मुंबईत कॅन्सरचे २२ हजारांवर रुग्ण!

By admin | Published: November 7, 2015 02:55 AM2015-11-07T02:55:43+5:302015-11-07T02:55:43+5:30

एकट्या मुंबईत कर्करुग्णांची संख्या २२ हजार ८६४ एवढी आहे. नागपुरात हेच प्रमाण ४३००, पुण्यात ५९२७ तर औरंगाबादेत २०६४ आहे. सर्वच प्रकारच्या कर्करोगाच्या रु ग्णांची नोंद घेतली

22,000 patients of cancer in Mumbai! | मुंबईत कॅन्सरचे २२ हजारांवर रुग्ण!

मुंबईत कॅन्सरचे २२ हजारांवर रुग्ण!

Next

नागपूर : एकट्या मुंबईत कर्करुग्णांची संख्या २२ हजार ८६४ एवढी आहे. नागपुरात हेच प्रमाण ४३००, पुण्यात ५९२७ तर औरंगाबादेत २०६४ आहे. सर्वच प्रकारच्या कर्करोगाच्या रु ग्णांची नोंद घेतली तर नागपुरात दर लाख लोकसंख्येपैकी १०७ महिला तर ९७ पुरुषांना कर्करोगाने ग्रासले आहे. वेळीच पावले न उचलल्यास एकट्या उपराजधानीत दर लाखात २२९ महिला तर १८२ पुरुष कॅन्सरच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, देशात स्तन आणि जिभेच्या कॅन्सरमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. पहिल्या क्रमांकावर अहमदाबाद आहे. राज्यातील मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहरांच्या तुलनेत नागपुरात कॅन्सर रुग्णांची संख्या अधिक असून त्यात वाढ होत आहे.

Web Title: 22,000 patients of cancer in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.