सराफाला २३ लाखांचा गंडा

By admin | Published: July 16, 2017 01:02 AM2017-07-16T01:02:58+5:302017-07-16T01:02:58+5:30

एका किरकोळ सोन्या-चांदीचे दागिने विकणाऱ्या व्यापाऱ्याने, ठाण्यातील एका मोठ्या सराफामालकाला सुमारे २३ लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली.

23 lakhs of gold | सराफाला २३ लाखांचा गंडा

सराफाला २३ लाखांचा गंडा

Next

-लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका किरकोळ सोन्या-चांदीचे दागिने विकणाऱ्या व्यापाऱ्याने, ठाण्यातील एका मोठ्या सराफामालकाला सुमारे २३ लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली. हा प्रकार घडल्यानंतर तब्बल एक महिन्याने या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.
मुंबईत भायखळा येथे राहणारे मनीष जैन (४५) यांची फसवणूक झाली आहे. त्यांचे ठाणे बाजारपेठेतील कौपिनेश्वर मंदिराजवळ मणिभद्र ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. मूळ उदयपूर, राजस्थान येथील भरत रजपूत (२५) या किरकोळ दागिने विकणाऱ्या व्यापाऱ्याने त्यांचा काही दिवसांतच विश्वास संपादन केला.
याचदरम्यान, त्याने जैन यांच्याकडून ९० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, ३०० ग्रॅम वजनाची सोन्याची ३ बिस्किटे, २५४ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे, १०० ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले आणि एक लाख रुपये रोकड, असा २२ लाख ७० हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार १२ मे ते ८ जून २०१७ दरम्यान जैन यांच्या दुकानात घडला. सोने आणि रोकड घेऊन भरत महिना उलटूनही परत येत नसल्याने, जैन यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन, त्याच्याविरोधात तक्रार नोंदविल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जे. एम. पाटील यांनी दिली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: 23 lakhs of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.