पथसंचलनासाठी राज्यातील २३ एनसीसी कॅडेटस्

By admin | Published: January 23, 2017 04:48 AM2017-01-23T04:48:29+5:302017-01-23T04:48:29+5:30

प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील २३ एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. देशभरातील

23 NCC Cadets of the state | पथसंचलनासाठी राज्यातील २३ एनसीसी कॅडेटस्

पथसंचलनासाठी राज्यातील २३ एनसीसी कॅडेटस्

Next

मुंबई : प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील २३ एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाचे २०६८ कॅडेट्स यात सहभागी झाले आहेत. मानाचे समजण्यात येणाऱ्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्रातील २३ कॅडेट्सची निवड झाली आहे.
छावनी भागातील डिजी एनसीसी परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील ११५ एनसीसी कॅडेट्स १ जानेवारी पासून या शिबीरात दाखल झाले आहेत. यातील २३ कॅडेटसची प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी तर ५ कॅडेट्सची राजपथावरील एनसीसीच्या घोडस्वार पथकामध्ये निवड झाली आहे. २८ जानेवारीला होणाऱ्या पंतप्रधान रॅलीमधे मानवंदना देण्यासाठी ५० एनसीसी कॅडेटसची निवड झाली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आदींना मानवंदना देण्यासाठी ११ कॅडेट्सची निवड झाली आहे अशी माहिती महाराष्ट्राच्या एनसीसी संघाचे प्रमुख कर्नल एस. गणपती यांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: 23 NCC Cadets of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.