२३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द

By admin | Published: July 18, 2016 04:32 AM2016-07-18T04:32:18+5:302016-07-18T04:32:18+5:30

मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील २३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनी रद्द केले

23 sugar mills canceled | २३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द

२३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द

Next


पुणे : शेतकऱ्यांच्या उसाला किमान हमी भाव (एफआरपी) न देता १४२ कोटी रूपये थकविल्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील २३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनी रद्द केले आहेत. १४ दिवसांत शेतकऱ्यांना हमी भावाप्रमाणे पैसे देणे आवश्यक असताना या कारखान्यांकडून त्याची पूर्तता न केल्यामुळे आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
बीड जिल्ह्यातील ३ कारखान्यांसह राज्यातील २३ कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांचे १४२ कोटी रूपये थकविले आहेत. दुष्काळातून शेतकरी सावरत असताना, त्यांना साखर कारखान्यांनी मदतीचा हात देणे आवश्यक असताना पैसे दिले जात नसल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित भाऊराव चव्हाण कारखाना आणि पुणे जिल्ह्यातील माजी खासदार
विदुरा नवले यांच्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 23 sugar mills canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.