कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे २४ तास दर्शन
By Admin | Published: November 1, 2016 06:07 PM2016-11-01T18:07:13+5:302016-11-01T18:07:13+5:30
भागवत एकादशी अर्थात कार्तिकी यात्रे निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत येतात त्यांच्या दर्शनाच्या सोयीसाठी आजपासून २४ तास दर्शन सुरु करण्यात आले
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 01 - भागवत एकादशी अर्थात कार्तिकी यात्रे निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत येतात त्यांच्या दर्शनाच्या सोयीसाठी आजपासून २४ तास दर्शन सुरु करण्यात आले असून त्यासाठी देवाचा पलंग उभा काढण्याचा विधी झाला.
येत्या ११ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी सोहळा पंढरीत रंगणार आहे त्यानिमित्त कर्नाटक आणि आंध्रसह राज्यातील लाखो भाविक पंढरीत येतात. त्या यात्रेचा शुभारंभ आज विठ्ठल मंदिरात झाला.
भाऊबीजेचा शुभ दिवसाच्या निमित्ताने आज देवाच्या शयनगृहातील पलंग उभा करण्यात आला. देवाच्या पाठीला लोड लावण्यात आला भाविकांना अखंड दर्शन देण्यासाठी देव उभा राहतो त्यामुळे देवाचा पलंग उभा करुन लोड लावण्याचा विधी शेकडो वर्षापासून करण्यात येतो. एकादशी होईपर्यंत भाविकाना सलग दर्शन व्हावे यासाठी देवाचे नित्योपचारही बंद करण्यात आले आहेत. पोर्णिमेनंतर पुन्हा विधीवत पूजा करुन पलंग उभा करण्यात येणार आहे.