नाशिकमधून २४ लाख टन कांद्याची विक्रमी निर्यात

By Admin | Published: March 25, 2017 02:27 AM2017-03-25T02:27:50+5:302017-03-25T02:27:50+5:30

कांद्याचे भरघोस उत्पादन होऊन जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे.

24 lakh tonnes of onion export from Nashik | नाशिकमधून २४ लाख टन कांद्याची विक्रमी निर्यात

नाशिकमधून २४ लाख टन कांद्याची विक्रमी निर्यात

googlenewsNext

शेखर देसाई / लासलगाव
कांद्याचे भरघोस उत्पादन होऊन जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामामध्ये जिल्ह्याने कांदा निर्यातीमध्ये नऊ महिन्यांत २४ लाख टनाचा टप्पा पार केला. २००९-१० च्या १८.७३ लाख टन निर्यातीचा विक्रम त्यामुळे मागे पडला.
देशात आजपर्यंत झालेल्या कांदा निर्यातीचा हा उच्चांक आहे. कांद्यावरील किमान निर्यात मूल्य दर हे शून्य केल्याने निर्यातीत वाढ झालेली आहे. देशातून झालेली २४ लाख टन कांदा निर्यात ही एप्रिल ते डिसेंबर महिन्यातील आहे. मार्च २०१७ पर्यंत कांदा निर्यात ३० लाख टन होण्याची शक्यता आहे. कांद्याला चारशे ते पाचशे रु पये क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादकांचा मात्र खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: 24 lakh tonnes of onion export from Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.