राज्यात २४ टक्के कमी पाऊस

By admin | Published: October 8, 2015 05:38 AM2015-10-08T05:38:08+5:302015-10-08T05:38:08+5:30

यंदाच्या हंगामात राज्यात मॉन्सूनचा पाऊस सरसरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यात परभणी, जळगाव, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत

24 percent less rainfall in the state | राज्यात २४ टक्के कमी पाऊस

राज्यात २४ टक्के कमी पाऊस

Next

पुणे : यंदाच्या हंगामात राज्यात मॉन्सूनचा पाऊस सरसरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यात परभणी, जळगाव, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत तर सरासरीपेक्षाही ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात विदर्भ विभागात बहुतांश जिल्ह्यांत पाऊस सरासरीइतका बरसला आहे.
यंदाच्या हंगामात मॉन्सूनने बळीराजाला प्रचंड ओढ दिली आहे. मॉन्सून दाखल झाल्यापासून १ जून ते ३० सप्टेंबर २०१५ यादरम्यान राज्यात सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला आहे. परभणीमध्ये तर सरासरीपेक्षा ५५ टक्कयांनी पाऊस कमी झाला आहे. यंदा मॉन्सून राज्यात दाखल झाल्यापासून मराठवाडा व मध्य
महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अल्पच
राहिले आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

देशात १४ टक्के कमी पाऊस
महाराष्ट्राप्रमाणेच अन्य राज्यांनासुद्धा एल निनोचा फटका बसला असून, अनेक राज्यांमध्ये यंदा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी झाला आहे़ पूर्व उत्तर प्रदेशात सर्वाधिक सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस कमी झाला आहे़ दिल्ली- ४३, हरियाणा- ३७, पूर्व मध्य प्रदेश- २९, बिहार, उत्तराखंड- २८ टक्के कमी पाऊस झाला आहे़ गुजरात- ६ टक्के, पश्चिम मध्य प्रदेश- ४, आंध्र किनारपट्टी- १०, पश्चिम बंगाल किनारपट्टी- ८ आणि अरुणाचल प्रदेश- ६ टक्के या काही विभागांतच सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे़ बाकी अन्य सर्व हवामान विभागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़

विभागनिहाय पाऊस
विभागसरासरीपेक्षा कमी
कोकण व गोवा३२%
मध्य महाराष्ट्र३४%
मराठवाडा४१%
विदर्भ१२%

सर्वाधिक दुष्काळी जिल्हे
जिल्हासरासरीपेक्षा कमी
परभणी५५%
जळगाव५४%
बीड, सोलापूर५२%
लातूर५१%
परभणी४७%

Web Title: 24 percent less rainfall in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.