राज्यातील २४ पेट्रोल पंप सील

By admin | Published: June 25, 2017 01:58 AM2017-06-25T01:58:23+5:302017-06-25T01:58:23+5:30

कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ३८ ठिकाणी राज्यात आतापर्यंत ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण

24 petrol pump seals in the state | राज्यातील २४ पेट्रोल पंप सील

राज्यातील २४ पेट्रोल पंप सील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ३८ ठिकाणी राज्यात आतापर्यंत ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने छापे टाकले आहेत. त्यापैकी २४ ठिकाणी मापात पाप केल्याचे समोर आल्यावर त्या-त्या पेट्रोलपंपावरील ते युनिट सील केले आहेत, तसेच कारवाई केलेल्या काही पेट्रोल पंपांवर चिप बसलेल्या युनिटवर वाहनचालकांना पाठवून, तेथे जास्तीत जास्त पेट्रोलची कशा प्रकारे विक्री होते, ही बाब उघडकीस आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. शनिवारी राज्यातील
सहा ठिकाणी पथक धाडल्याची माहिती
सूत्रांनी दिली.
पेट्रोल पंपांवर वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल टाकणाऱ्या मशिनमध्ये पल्सर नामक यंत्र असते. या यंत्रामध्ये हेराफेरी करून ग्राहकांना कमी इंधन देणाऱ्या पेट्रोलपंपांवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी १७ जूनला पहिली कारवाई केली. शनिवारी १८ जूनला ठाण्यातील इंडियन आॅइलच्या ऐकी आॅटो सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर पोलिसांनी छापा टाकला, या वेळी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी येथे प्रात्यक्षिकही केले.
त्यानंतर, राज्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागामार्फत छापासत्र सुरू आहे. या सत्रात शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी ठाणे, नाशिक, रायगड, पुणे, सातारा, औरंगाबाद आणि मुंबई अशा ३८ ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये २४ ठिकाणी पेट्रोलची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.


कारवाईचा तपशील
जिल्हा       कारवाई       सील
ठाणे              १७            १४
नाशिक         ०८             ०३
रायगड          ०६            ०१
पुणे                ०२            ०२
सातारा           ०२            0२
मुंबई              ०२             ०१
औरंगाबाद        ०१           ०१

Web Title: 24 petrol pump seals in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.