नागपूरमध्ये न्यायालयाने मंजूर केला अडीच कोटींचा घटस्फोट
By Admin | Published: July 20, 2015 12:37 AM2015-07-20T00:37:33+5:302015-07-20T00:37:33+5:30
नागपूर कौटुंबिक न्यायालयाने एका दाम्पत्यास आपसातील सहमतीने मंजूर केलेला घटस्फोट हा शहरातील बहुधा सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे. यात पतीकडून पत्नी आणि मुलीच्या
राहुल अवसरे, नागपूर
नागपूर कौटुंबिक न्यायालयाने एका दाम्पत्यास आपसातील सहमतीने मंजूर केलेला घटस्फोट हा शहरातील बहुधा सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे. यात पतीकडून पत्नी आणि मुलीच्या पोटगी व इतर व्यवस्थेसाठी २ कोटी ८५ लाख रुपये दिले जाणार आहेत.
नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आय. एम. बोहरी यांनी उभयपक्षी सहमतीनंतर घटस्फोटाचा हा दावा निकाली काढला. घटस्फोट झालेले दाम्पत्य नागपुरातील गर्भश्रीमंत, प्रतिष्ठित व व्यावसायिक कुटुंबातील आहे. पती ४४ आणि पत्नी ४३ वर्षांची आहे. या दोघांचा विवाह पंचवीस वर्षांपूर्वी मोठ्या थाटात पार पडला होता. २५ फेब्रुवारी २०१२पर्यंत तब्बल २२ वर्षे त्यांचा संसार सुरळीत होता. त्यांना २४ वर्षांची मुलगी आणि २० वर्षांचा मुलगा आहे. अचानक पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाले आणि ते वेगवेगळे राहू लागले. भविष्यात एकत्र राहण्याची आशा नसल्याने त्यांनी परस्पर सामंजस्यातून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
पतीने २२ मार्च २०१३ रोजी घटस्फोटासाठी न्याचिका दाखल केली होती. पत्नीनेही आपला दावा दाखल केला होता. दोघेही परस्पर सामंजस्यातून घटस्फोट देण्यास तयार झाले. दोघेही परस्परांपासून घटस्फोट याचिकाकर्त्या व्यावसायिकाने ताबडतोब पत्नीच्या एकमुस्त खावटीचा तसेच मुलीच्या निर्वाह, शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाच्या रकमेचे ‘पे आॅर्डर’ न्यायालयात दिले.