महाड प्रदूषणमुक्तीसाठी 25 कोटी
By admin | Published: August 8, 2014 12:23 AM2014-08-08T00:23:17+5:302014-08-08T00:23:17+5:30
शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यामध्ये केवळ घोषणा करून भागणार नाही तर सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले
Next
>महाड : शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यामध्ये केवळ घोषणा करून भागणार नाही तर सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले पाहिजे, महाड औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सांडपाणी सावित्री खाडीत दूरवर सोडण्यासाठी नव्याने विस्तारीत वाहिनी टाकण्यासाठी येत्या काही दिवसांतच 25 कोटी रू. निधीची तरतूद करणार असल्याचे सांगून गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री सचिन अहिर यांनी महाडला प्रदूषणमुक्त करणार असल्याची ग्वाही दिली.
सुवर्णजयंती राजस्व अभियान अंतर्गत वन आणि महसूल विभागातर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सचिन अहिर बोलत होते. यावेळी आदिवासी बांधवांना पिवळया शिधापत्रिकेचे वाटपही अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार माणिक जगताप, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, उपजिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम, नगराध्यक्षा भारती सपकाळ आदि उपस्थित होते.
अहिर पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचे विचार सोबत घेवूनच ख:या अर्थार्न लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम शासन करीत असून समाजातील मागास व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांर्पयत विविध योजना पोचवण्याचे काम शासन करीत आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वानीच प्रय} करण्याचे आवाहन सचिन अहिर यांनी यावेळी केले. माणिक जगताप यांनी शासनाच्या योजना शेवटच्या घटकार्पयत पोहचत नसल्याने अनेक घटक या योजनांपासून वंचित राहत असल्याची खंत व्यक्त केली. उपजिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी प्रस्ताविक केल. (वार्ताहर)