मुलींसाठी अडीच लाखांची शिष्यवृत्ती
By admin | Published: June 13, 2017 01:40 AM2017-06-13T01:40:21+5:302017-06-13T01:40:21+5:30
फॉर यंग वूमेन इन सायन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम अंतर्गत देशातील बारावी पास झालेल्या मुलींना प्रत्येकी अडीच लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फॉर यंग वूमेन इन सायन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम अंतर्गत देशातील बारावी पास झालेल्या मुलींना प्रत्येकी अडीच लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या एकूण ५० विद्यार्थिनींना
या शिष्यवृत्तीचा फायदा घेता
येईल. त्यासाठी आवश्यक अर्ज विद्यार्थिनींना १० जुलैपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.
देशातील मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती विद्यार्थिनींना दिली जाईल. आतापर्यंत संस्थेने ३०० तरुण मुलींना विज्ञान शाखेतील करिअरसाठी सक्षम केले आहे. या शिष्यवृत्तीसाठी गेल्या वर्षी ३ हजारांहून अधिक प्रवेश अर्ज आले होते. चालू शैक्षणिक वर्षात बारावी इयत्तेत पीसीएम व पीसीबीमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. मात्र ३१ मे २०१७ रोजी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीचे वय १९ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शिष्यवृत्ती विज्ञान शाखेतील कोणत्याही क्षेत्रातील अभ्यासासाठी खुली आहे. विद्यार्थिनींनी www.foryoungwomeninscience.com या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.