मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 25 लाखांची मदत, उदय सामंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 02:58 PM2023-02-12T14:58:46+5:302023-02-12T14:59:26+5:30

Shashikant Warise : मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाखांची मदत देण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केली. 

25 lakhs from the government to the family of deceased journalist Shashikant Warise, Uday Samant announced | मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 25 लाखांची मदत, उदय सामंत यांची घोषणा

मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 25 लाखांची मदत, उदय सामंत यांची घोषणा

googlenewsNext

मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाखांची मदत देण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केली. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती. दरम्यान उदय सामंत यांनी आज याबाबतची घोषणा केली.  

आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख अशी मदत मयत पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याची घोषणा पालकमंत्री सामंत यांनी आज येथे केली. याशिवाय वारिसे यांच्या मुलाला कायमची नोकरी देण्याची जबाबदारीही श्री.सामंत यांनी स्वीकारली आहे.

Web Title: 25 lakhs from the government to the family of deceased journalist Shashikant Warise, Uday Samant announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.