महाराष्ट्रातील २५ पक्ष ‘आउट’
By admin | Published: December 26, 2016 01:06 AM2016-12-26T01:06:24+5:302016-12-26T01:06:24+5:30
निवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांना यादीतून हटविले असून, यात महाराष्ट्रातील २५ राजकीय पक्षांचा समावेश आहे.
हरीश गुप्ता / नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांना यादीतून हटविले असून, यात महाराष्ट्रातील २५ राजकीय पक्षांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश पक्षांची नोंदणी ही मुंबईतील आहे.
रद्द करण्यात आलेल्या या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे; पण २००५नंतर या पक्षांनी एकही निवडणूक लढविलेली नाही. देणग्या आणि करातून सूट याचा लाभ मात्र या पक्षांकडून घेण्यात येत होता. या राजकीय पक्षांनी निवडणूकच लढविली नाही आणि याच कारणास्तव त्यांची नोंदणी किंवा मान्यता रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही.
त्यामुळे केवळ कागदोपत्री
असणाऱ्या या पक्षांविरुद्ध कार्यवाहीसाठी आयोगाने अन्य पर्याय निवडला. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला एक पत्र देऊन महाराष्ट्रातील या २५ पक्षांना त्यांच्या यादीतून हटविण्याबाबत त्यांनी सांगितले. हे पक्ष देणग्या आणि अन्य लाभ घेत होते. गोव्यातील चार राजकीय पक्षांनाही या यादीतून वगळण्यात आले आहे.
हे पक्ष यादीतून बाहेर
१. अखिल भारतीय भारत माता-पुत्र पक्ष (धुळे), २. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन सेना (पुणे), ३. बहुजन महासंघ पक्ष (अकोला), ४. भारतीय संताजी पार्टी, नागपूर, ५. काँग्रेस आॅफ पिपल (मुंबई), ६. लोक राज्य पार्टी (मुंबई), ७. महाराष्ट्र प्रदेश क्रांतीकारी पार्टी (सातारा), ८. महाराष्ट्र राजीव काँग्रेस (मुंबई), ९. महाराष्ट्र सेक्युलर फ्रंट (मुंबई), १०. महाराष्ट्र विकास काँग्रेस (जळगाव), ११. नारीशक्ती पाटी (मुंबई), १२. नाग विदर्भ आंदोलन समिती (नागपूर), १३. नॅशनल मायनॉरिटी पार्टी (मुंबई), १४. नॅशनल रिपब्लिक पार्टी (मुंबई), १५. नेटिव्ह पीपल्स पार्टी (मुंबई), १६. नवमहाराष्ट्र विकास पार्टी (मुंबई), १७. नेताजी काँग्रेस सेना (पुणे), १८. पीपल्स डेमॉक्रॅटिक लीग आॅफ इंडिया (नागपूर), १९. रिपब्लिक मुव्हमेंट (चंद्रपूर), २०. सचेत भारत पार्टी (मुंबई), २१. समाजवादी जनता पार्टी (महाराष्ट्र) (मुंबई), २२. दी कन्झ्युमर पार्टी आॅफ इंडिया (मुंबई), २३. विदर्भ जनता काँग्रेस (नागपूर),
२४. विदर्भ राज्य मुक्ती मोर्चा (नागपूर), २५. वूमनिस्ट पार्टी
आॅफ इंडिया (मुंबई).