२५ टक्के आरक्षित प्रवेशाची लॉटरी जाहीर
By admin | Published: May 13, 2014 08:18 PM2014-05-13T20:18:32+5:302014-05-14T01:54:43+5:30
शिक्षण हक्क कायद्यामधील तरतुदीनुसार आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकातील मुलांचे खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षणाच्या ऑनलाईन प्रवेशाची लॉटरी मंगळवारी राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली.
मुंबई :
शिक्षण हक्क कायद्यामधील तरतुदीनुसार आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकातील मुलांचे खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षणाच्या ऑनलाईन प्रवेशाची लॉटरी मंगळवारी राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. पहिल्या फेरीत ३ हजार ३८0 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. ५७ खासगी शाळांतील १ हजार ५६९ जागांसाठी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. तर उर्वरित विद्यार्थ्यांना पसंतीप्रमाणे प्रवेश देण्यात आले. प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच प्रवेशाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मुंबई आणि परिसरातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षणाची लॉटरी मंगळवारी काढण्यात आली. पालिका क्षेत्रातील ३१२ शाळांमध्ये ८ हजार २२३ जागांसाठी ६ हजार ५७५ अर्ज प्राप्त झाले होते. ५७ शाळांसाठीच प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्याने ५७ शाळांचीच लॉटरी काढण्यात आली. तसेच १७१ शाळांमधील ५ हजार १८६ जागांसाठी अर्ज केलेल्या १ हजार ८११ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे प्रवेश देण्यात आले. विद्यार्थ्यांनी २0 मेपर्यंत संबंधीत शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. या विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली आहे. २0 मेपर्यंत विद्यार्थ्यांनी संबंधीत शाळेत प्रवेश न घेतल्यास त्यांचा प्रवेश बाद ठरणार आहे.
८४ शाळांसाठी १ हजार ४६८ जागा उपलब्ध असताना एकही अर्ज प्राप्त झाला नाही. मंगळवारच्या प्रवेश प्रक्रियेपासून वंंचित राहणार्या विद्यार्थ्यांना दुसर्या टप्प्यात ऑनलाईन प्रवेश देण्याचा निर्णय महापालिका प्रशासन घेणार असल्याचे, शिक्षणाधिकारी शांभवी जोगी यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निित झाल्यानंतरच दुसर्या टप्प्याची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.