दोन वर्षांत २५ गावे झाली दुष्काळमुक्त
By admin | Published: May 5, 2015 01:10 AM2015-05-05T01:10:01+5:302015-05-05T01:10:01+5:30
राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निश्चय करीत आर्ट आॅफ लिव्हिंग या सामाजिक संस्थेने मराठवाड्यात स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जलजागृती
मुंबई : राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निश्चय करीत आर्ट आॅफ लिव्हिंग या सामाजिक संस्थेने मराठवाड्यात स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जलजागृती अभिायन सुरू केले. २०१३पासून सुरू केलेल्या या अभिायनामुळे २५ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटल्याचा दावा संस्थेने केला आहे.
अभियानाचे राज्य संचालक मकरंद जाधव म्हणाले की, संस्थेने केलेल्या संशोधनात मराठवाड्यातील प्रत्येक गावात बंधारा, नदी, ओढा किंवा नाला, तलाव अशा विविध जलस्रोतांचा समावेश आहे. मात्र स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांतील पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली. त्यामुळे पाणी साठवणुकीतील अडथळे दूर करून नैसर्गिक संसाधने पुन्हा पाण्याने भरण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे.
स्थानिक ग्रामस्थांना भागीदार करून घेत नद्या, तलाव, बंधारा आणि ओढ्यांना पुनर्जीवित करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक निधीच्या ५० टक्के निधी संस्थेकडून तर उर्वरित ५० टक्के निधी लोकवर्गणीतून जमा केला जातो. हे सर्व काम स्थानिक ग्रामस्थांच्या देखरेखेखाली होत असल्याने लोकही आत्मियतेने काम करत आहेत.