विमानतळासाठी दिली २५० हेक्टर वनजमीन
By admin | Published: July 12, 2017 04:48 AM2017-07-12T04:48:17+5:302017-07-12T04:48:17+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वनविभागाची रायगड जिल्ह्यातील २५० हेक्टर जमीन देण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वनविभागाची रायगड जिल्ह्यातील २५० हेक्टर जमीन देण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. त्यात सर्वाधिक ८५ हेक्टर जमीन ही पनवेल तालुक्यातील ओवळे गावची आहे.
या जमिनीपैकी कांदळवन क्षेत्र हे १०८.६० हेक्टर असून, १४१. ४५ हेक्टर क्षेत्र हे राखीव वन आहे. पनवेलच्या ओवळेसह कोपर (२३.७१ हेक्टर), पारगाव (३६), पागावदुंगी (१८.५०), उलवे (०.२१२), तरघर (३.९२), वाघिवली (०.५९), क्रिक एरिया (९.७८) आणि पनवेल (६,८२ हेक्टर) अशी वनजमीन विमानतळासाठी देण्यात आली आहे. विमानतळासाठी वनजमीन मिळण्यासाठी सिडकोने राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षकांकडे अर्ज केला होता. राज्य शासनाने वनजमिनीसाठी केंद्राकडे परवानगी मागितली होती. ती मिळाल्यावर, विमानतळासाठी जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आज तसा आदेश काढीत महसूल विभागाने त्यावर शिक्कामोर्तब केले.