मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा २.५० लाख; अनुसूचित जातींना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 01:24 AM2018-09-08T01:24:28+5:302018-09-08T01:24:58+5:30

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जातींच्या पालकांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा २ लाख रुपयांवर २ लाख ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या अलिकडच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 2.50 lakhs for matriculation scholarships; Resolve to Scheduled Castes | मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा २.५० लाख; अनुसूचित जातींना दिलासा

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा २.५० लाख; अनुसूचित जातींना दिलासा

Next

मुंबई : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जातींच्या पालकांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा २ लाख रुपयांवर २ लाख ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या अलिकडच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची योजना केंद्र सरकारकडून चालविली जाते. पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्तीची रक्कम संबंधित महाविद्यालयांना प्रदान केली जाते तर निर्वाह भत्त्याची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्याठीची पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा २०१४ मध्येच केंद्र सरकारने २ लाख रुपयांवरून २.५० लाख रुपये केली होती. मात्र, राज्य सरकारने त्या बाबतचा निर्णय घेतलेला नव्हता. आता तो घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर कुठलाही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. उलट सुधारित उत्पन्न मर्यादा लागू झाल्याने तो कमी होणार आहे. अन्य खर्चाची प्रतिपूर्ती ही केंद्र सरकारकडून केली जाते.

Web Title:  2.50 lakhs for matriculation scholarships; Resolve to Scheduled Castes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.