अडीच हजार गावे करणार दुष्काळमुक्त, भारतीय जैन संघटनेचे भद्रावती येथे राज्य अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 03:26 AM2018-01-08T03:26:58+5:302018-01-08T03:28:05+5:30

भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून राज्यातील ७५ तालुक्यांमधील २ हजार ५०० गावे दुष्काळमुक्त करण्यात येईल

25,000 villages will be free of drought, the Bharatiya Jain organization's Bhadravati state session | अडीच हजार गावे करणार दुष्काळमुक्त, भारतीय जैन संघटनेचे भद्रावती येथे राज्य अधिवेशन

अडीच हजार गावे करणार दुष्काळमुक्त, भारतीय जैन संघटनेचे भद्रावती येथे राज्य अधिवेशन

Next

भद्रावती (चंद्रपूर) : भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून राज्यातील ७५ तालुक्यांमधील २ हजार ५०० गावे दुष्काळमुक्त करण्यात येईल, असा संकल्प भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी जाहीर केला.
भारतीय जैन संघटनेच्या वतीने भद्रावती येथील ऐतिहासिक जैन मंदिरात शनिवारी महाराष्ट्र राज्य अधिवेशन झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख, राष्टÑीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन, प्रकाशचंद सुराणा, हस्तीमन बंब आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
मागील ३२ वर्षांपासून भारतीय जैन संघटनेतर्फे राबविण्यात आलेल्या लोकाभिमुख उपक्रमांची माहिती देऊन उद्घाटनाप्रसंगी मुथा म्हणाले, राष्टÑीय आपत्ती, मुलींचे कमी होणारे प्रमाण, कौटुंबिक समस्या, सामूहिक विवाह, वधू-वर संमेलन, अनाथ मुले, आत्महत्याग्रस्त शेतकºयांचे कुटुंब, शैक्षणिक कार्य तसेच श्रमदानासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यातून विधायक कार्याची तेजस्वी परंपरा निर्माण झाली.
‘समय है बदलाव का, समय के साथ बदल’ या विषयावर अधिवेशनात प्रामुख्याने चर्चा झाली. पुगलिया म्हणाले, मानवता हाच खरा धर्म असून तो आचरणात आणून आदर्श निर्माण केला पाहिजे. भारतीय जैन संघटनेकडून सुरू असलेल्या कार्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्यांकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. संचालन संजय सिंगी, तर प्रास्ताविक अमर गांधी यांनी केले. अधिवेशनात भारतीय जैन संघटनेचे माजी अध्यक्ष पारस ओस्वाल, गौतम संचेती, रजनीश जैन, निर्मल बरडीया, महेंद्र सुराणा, प्रतापचंद कोठारी, प्रशांत खजांची, सुधीर बाठीया तसेच राज्यातील पदाधिकारी व प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
१० लाख विद्यार्थ्यांना ‘मूल्यवर्धित’ शिक्षणाचे धडे
महाराष्टÑ दुष्काळमुक्त करण्यासाठी एप्रिल आणि मे २०१८ मध्ये ७५ तालुक्यांतील २ हजार ५०० गावांत एकाच वेळी जेसीबी व पोकलेनद्वारे जलसंधारणाची कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी भारतीय जैन संघटनेतर्फे १०० जेसीबी व पोकलेन मशीन खरेदी करण्यात येतील. याच वर्षी ७५ तालुक्यांमध्ये वॉटर कप स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.
१०७ तालुक्यांतील शिक्षक आणि १० लाख विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित शिक्षणाचे धडे भारतीय जैन संघटनेच्या वतीने दिले जात आहे, अशी माहिती शांतीलाल मुथा यांनी दिली.

Web Title: 25,000 villages will be free of drought, the Bharatiya Jain organization's Bhadravati state session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.