गोव्यात ख्रिस्ती 25.10, तर मुस्लिम लोकसंख्या 8.33 टक्के
By admin | Published: July 25, 2016 08:52 PM2016-07-25T20:52:42+5:302016-07-25T20:52:42+5:30
राज्यात ख्रिस्ती धर्मियांची लोकसंख्या 25.1क् टक्के झाली आहे, तर इस्लामचे पालन करणा:या मुस्लिम धर्मियांची संख्या 8.33 टक्के आहे. हिंदू धर्मियांची लोकसंख्या 66.08 टक्के आहे
ऑनलाइन लोकमत
पणजी : राज्यात ख्रिस्ती धर्मियांची लोकसंख्या 25.1क् टक्के झाली आहे, तर इस्लामचे पालन करणा:या मुस्लिम धर्मियांची संख्या 8.33 टक्के आहे. हिंदू धर्मियांची लोकसंख्या 66.08 टक्के आहे, अशी माहिती गोवा सरकारतर्फे सोमवारी विधानसभेत सादर झालेल्या आर्थिक सव्रेक्षण अहवालातून पुढे आली आहे. मुस्लिमांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी म्हणजे 84.73 टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे.
राज्यात सरासरी एक हजार पुरुषांमागे 973 महिला असे प्रमाण असताना ख्रिस्ती धर्मियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. 1 हजार पुरुषांमागे ख्रिश्चन धर्मियांमध्ये 1 हजार 129 महिला असे प्रमाण आहे. हिंदू धर्मियांमध्ये मात्र 1 हजार पुरुषांमागे 929 महिला असे प्रमाण आहे, तर मुस्लिम धर्मियांमध्ये हे प्रमाण 905 आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गोव्यातील शिख बांधवांमध्ये एक हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण केवळ 707 आहे. जैन समाजात लहान मुलांमागे मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. 1 हजार मुलांमागे जैन समाजात 1018 मुली असे प्रमाण दिसून आल्याचे सव्रेक्षण अहवालात म्हटले आहे. गोव्यातील जैन समाजातील लोकांमध्ये साक्षरतेचे प्रमाण 95.58 टक्के आहे, तर शिख समाजात हे प्रमाण 91.91 टक्के आहे.
2014 साली एक हजार लोकसंख्येमागे जन्मदर 14.29 होता, तर 2014 साली हा दर 8.47 झाला आहे. जन्म-मृत्यू नोंदणी खात्याने तशी नोंद केली आहे. 2014 साली एक हजार अर्भकांच्या जन्मामागे अर्भक मृत्यू प्रमाण 9.57 राहिले. 2क्12 साली हे प्रमाण 9.62 टक्के होते. एक हजार जीवंत अर्भकांमागे किती अर्भके एक वर्षाची होण्यापूर्वीच मृत्यू पावली हे पाहून अर्भक मृत्यू प्रमाण निश्चित केले जाते. राज्यातील सर्व प्रकारच्या एकूण एक हजार लोकसंख्येमागे 8.19 मृत्यू असे प्रमाण आहे. 2क्14 साली हे प्रमाण 8.47 झाले.
गोव्यावरील एकूण सार्वजनिक कर्जाचे प्रमाण दि. 31 मार्च 2015 र्पयत 10836.15 कोटी झाले आहे. कर्जाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे, असे अहवालात म्हटले आहे. राज्यात एकूण 787 बँक शाखा आहेत. या शाखांमध्ये एकूण दि. 31 मार्च 2016 र्पयत 63339 कोटी रुपये ठेवीच्या रूपात जमा झाले आहेत. ठेवींचे हे प्रमाण तत्पूर्वी 54748 कोटी होते.