लवासासारखी २६ शहरे उभारणे शक्य- शरद पवार
By admin | Published: June 24, 2014 12:40 AM2014-06-24T00:40:50+5:302014-06-24T15:13:21+5:30
निसर्गसौंदर्याने नटलेल्या लवासासारख्या आणखी २६ साइट उभारता येऊ शकतील अशा जागा राज्यामध्ये आहेत.
Next
>पुणे : निसर्गसौंदर्याने नटलेल्या लवासासारख्या आणखी २६ साइट उभारता येऊ शकतील अशा जागा राज्यामध्ये आहेत. इंग्लंडप्रमाणो महाराष्ट्रातही अशी शहरे उभारून विकासाचा पुढचा टप्पा गाठता येऊ शकेल. या विकासाला विरोध करण्यासाठी उभ्या राहणा:या शक्तींना अवास्तव महत्त्व देऊ नये, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) 8क्व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी असोचॅमचे अध्यक्ष व येस बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक राणा कपूर यांना ‘एमसीसीआयए एक्सलंन्स अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महापौर चंचला कोद्रे, एमसीसीआयएचे अध्यक्ष एस.के. जैन उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘लवासा प्रकल्पाला दर शनिवार-रविवारी दहा हजार पर्यटक भेट देत आहेत, एक
उत्तम पर्यटन सिटी म्हणून ते पुढे
आले आहे. मात्र, लवासाला
झालेल्या विरोधामुळे 3 ते 4 वर्षापासून कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. विकासाला विरोध करणा:या अशा शक्तींना अवास्तव महत्त्व दिले जाऊ नये. लवासाप्रमाणो मुबलक पाणीसाठा असलेल्या आणखी 26 साइट राज्यात आहेत, त्या विकसित करता येऊ शकतील.’’या वेळी राणा कपूर, एस.के. जैन यांनी विचार व्यक्त केल़े (प्रतिनिधी)
गेल्या दहा वर्षात विक्रमी उत्पन्न
गेल्या दहा वर्षात केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम पाहिले. या काळात साखर, तांदूळ, फळे यांचे विक्रमी उत्पादन देशाने घेतले. साखर आणि तांदळाची सर्वाधिक निर्यात भारताने गेली. शेतीमालाचे भाव वाढले की, लगेच वर्तमानपत्रमध्ये माझे फोटो झळकायचे.
अन्नधान्यावर प्रक्रिया करून ते निर्यात करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. अन्नधान्यांवर प्रक्रिया करण्याचे आंतरराष्ट्रीय हब म्हणून पुणो विकसित करता येऊ शकेल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.