२६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली माफीचा साक्षीदार
By Admin | Published: December 10, 2015 08:49 PM2015-12-10T20:49:38+5:302015-12-10T21:46:05+5:30
मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सुत्रधार डेव्हिड हेडलीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी त्याने सर्व गुन्हांची कबुली दिली.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सुत्रधार डेव्हिड हेडलीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी त्याने शिक्षा माफ झाली तर माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगितले. त्यानंतर कोर्टाने त्याला माफी देऊन माफीचा साक्षीदार बनविले.
मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील गुन्हांची कबुली दिली. यावेळी त्याने शिक्षा माफ झाली तर माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे सांगितले. दरम्यान याप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तपास अधिका-यांसोबत सल्ला-मसलत करण्यासाठी काही वेळ मागितला. त्यानंतर त्याला कोर्टाने माफी देऊन माफीचा साक्षीदार बनविण्याचा निर्णय घेतला.
डेविड हेडली हा लष्कर-ए-तयब्बाचा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असून मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेतील तुरुंगात तो ३५ वर्षांची शिक्षा भोगत आहे.