२७ लेखापरीक्षक बडतर्फ
By Admin | Published: April 1, 2016 12:33 AM2016-04-01T00:33:34+5:302016-04-01T00:33:34+5:30
कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरुन राज्यातील २७ सनदी लेखापाल, सनदी लेखापालांच्या फमर्स व प्रमाणित लेखापरीक्षक यांना नामतालिकेतून निलंबित करण्यात आले.
पुणे : कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरुन राज्यातील २७ सनदी लेखापाल, सनदी लेखापालांच्या फमर्स व प्रमाणित लेखापरीक्षक यांना नामतालिकेतून निलंबित करण्यात आले. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने लेखापालांवर कारवाई झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली.
लेखापरीक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्याने, लेखापरीक्षण करताना संस्थेतील अपहार व गैरव्यवहार उघडकीस न आणल्याने, संस्थेची खरी व वास्तव आर्थिक स्थिती निदशर्नास न आणल्याने व अपहार, गैरव्यवहारासह गंभीर मुद्यांचा समावेश असलेला विशेष अहवाल सादर न करणे, असे बडतर्फ लेखापालांवर आरोप आहेत. त्यांना नोटीसा बजावून निलंबनाची कारवाई करण्यात आली, अशी माहिती दळवी यांनी दिली.