लातुरात २७ लाखांचा गुटखा पकडला
By admin | Published: August 26, 2016 07:25 PM2016-08-26T19:25:21+5:302016-08-26T19:25:21+5:30
नांदेड रोडवरील कोळपा शिवारात असलेल्या एका ढाब्यावर थांबलेल्या ट्रकचालकास गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हटकले. दरम्यान, ट्रकचालकाची अधिक चौकशी केली
Next
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 26 - नांदेड रोडवरील कोळपा शिवारात असलेल्या एका ढाब्यावर थांबलेल्या ट्रकचालकास गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हटकले. दरम्यान, ट्रकचालकाची अधिक चौकशी केली असता ट्रकमध्ये तब्बल २७ लाख ५४ हजारांचा गुटखा वाहतूक करत असल्याचे आढळून आले असून, या प्रकरणी चालकास अटक करण्यात आली आहे.
राजकुमार सुरजराम मिना (३२ रा. अत्तापूर हैदराबाद) हा हैदराबाद येथून आपल्या (एम. एच. ४३ वाय ५२५१) या टेम्पोतून गुटखा वाहतूक करत होता. दरम्यान तो शुक्रवारी पहाटे कोळपा येथील एका ढाब्यावर थांबला होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यास हटकले. यावेळी तो उडवाडवीची उत्तरे देत होता. यावरुन पोलिसांचा संशय अधिक बळावला. यावेळी टेम्पोची तपासणी केली असता, टेम्पोत ४० पोत्यांतून तब्बल २७ लाच ५४ हजारांचा गुटखा विक्रीसाठी घेवून जात असताना चालकास अटक करण्यात आली. हा गुटखा कोणाच्या सांगण्यावरुन तो वाहतूक करत होता. याचा मात्र, पोलिसांना अद्याप शोध घेता आला नाही. हैदराबाद येथून हा गुटखा आपण आपल्या मालकाच्या सांगण्यावरुन घेवून जात असल्याचे त्याने सांगितले. लातुरात आल्यानंतर आपल्याला कोणाच्या ताब्यात हा गुटखा द्यायचा याबाबत सांगितले जाणार होते. त्यांच्याच निरोपाची वाट पाहत आपण कोळपा येथील ढाब्यावर थांबालो होतो, असे आरोपी चालक राजकुमार मीना याने पोलिसांना सांगितले. यावेळी पोलिसांनी टेम्पोसह तब्बल एकूण ३७ लाख ५४ हजारांचा मुद्देमला जप्त केला आहे.
सहज हटकल्याने फुटले बिंग...
ढाब्यावर थांबलेल्या त्या टेम्पोचालकाला गस्तीवर असलेल्या पोलिसांनी सहज हटकल्यानंतर आलेल्या संशयावरुन २७ लाख रुपयांच्या गुटख्याच्या तस्करीचे बिंग फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. लातूर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा घेवून निघालेल्या वाहनाची पोलिसांना मात्र साधी खबरबातही नव्हती. योगायोग म्हणजे सहज हटकल्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ््यात अडकला.