कल्याण, डोंबिवलीत स्वाइन फ्लूचे २७ रुग्ण

By admin | Published: March 11, 2015 02:11 AM2015-03-11T02:11:50+5:302015-03-11T02:11:50+5:30

केडीएमसी क्षेत्रात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असून गेल्या आठ दिवसांत सात जणांना लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे

27 patients of Kalyan, Dombivli swine flu | कल्याण, डोंबिवलीत स्वाइन फ्लूचे २७ रुग्ण

कल्याण, डोंबिवलीत स्वाइन फ्लूचे २७ रुग्ण

Next

कल्याण : केडीएमसी क्षेत्रात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असून गेल्या आठ दिवसांत सात जणांना लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत ५४ संशयित रुग्ण आढळले आहेत. विशेष बाब म्हणजे यात तीन खासगी डॉक्टरांचा समावेश आहे.
नव्या रूग्णांमध्ये चार डोंबिवलीचे असून उर्वरीत कल्याणचे आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ठाकुर्ली येथील एका ५६ वर्षीय महिलेला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केला आहे. स्वाइनची लागण झालेल्या डॉक्टरांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. वातावरणात उष्णता वाढल्याने स्वाइनचे प्रमाण कमी व्हायला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांत एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याची माहीती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ लिलाधर मस्के यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 27 patients of Kalyan, Dombivli swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.