महाराष्ट्रात एकूण २.७० कोटी वाहने

By admin | Published: March 18, 2016 02:20 AM2016-03-18T02:20:49+5:302016-03-18T02:20:49+5:30

राज्यात १९७१मध्ये केवळ ३ लाख ११ हजार ७६९ वाहने होती. आज ही संख्या तब्बल २ कोटी ७० लाख ६४ हजार ४५३वर पोहोचली आहे. गेल्या ४५ वर्षांमध्ये वाहन उद्योगाची झालेली ही भरभराट

2.70 crore vehicles in Maharashtra | महाराष्ट्रात एकूण २.७० कोटी वाहने

महाराष्ट्रात एकूण २.७० कोटी वाहने

Next

मुंबई : राज्यात १९७१मध्ये केवळ ३ लाख ११ हजार ७६९ वाहने होती. आज ही संख्या तब्बल २ कोटी ७० लाख ६४ हजार ४५३वर पोहोचली आहे. गेल्या ४५ वर्षांमध्ये वाहन उद्योगाची झालेली ही भरभराट आज जारी करण्यात आलेल्या सन २०१५-१६च्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आली आहे.
१ कोटी ९७ लाख ५ हजार ५११ मोटारसायकली, ३८ लाख ३६ हजार २९४ मोटरगाड्या, जीप आणि स्टेशन वॅगन्स, २ लाख १७ हजार ६२ टॅक्सी कॅब्ज्, ७ लाख २४ हजार ८० स्वयंचलित रिक्षा, २२ हजार ४०२ स्कूल बसेस, ४९ हजार ४८७ ट्रॅक्टर्स राज्यात आहेत. २०१५च्या आकडेवारीचा विचार करता २०१६च्या आर्थिक वर्षात तब्बल २१ लाख वाहने वाढली. राज्यात ४५ वर्षांपूर्वी दर लाख लोकसंख्येमागे मोटर वाहनांची संख्या केवळ ६१८ होती. आज ती २३ हजार ९ इतकी आहे. दर लाख लोकसंख्येमागे रुग्णवाहिकांची संख्या मात्र केवळ १२ आहे. राज्यात २ लाख ९९ हजार ३६८ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. कोकण -३३,२१९ किमी, पश्चिम महाराष्ट्र ६८८२२, उत्तर महाराष्ट्र ६६१६६, मराठवाडा - ६५४९७ अमरावती २८२८६ तर नागपूर विभागात ३७३७८ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. ही आकडेवारी डिसेंबर २०१५ अखेरची आहे. राज्यात १९६५-६६मध्ये केवळ ५१ हजार ७८८ किलोमीटर लांबीचे रस्ते होते. आता हा आकडा २ लाख ९९ हजार ३६८ किमीवर गेला आहे. त्यात राष्ट्रीय महामार्ग ४७६६, प्रमुख राज्य महामार्ग ६१६३, राज्य महामार्ग ३३८६०, प्रमुख जिल्हा रस्ते ५०५८५, इतर जिल्हा रस्ते ५८११५, ग्रामीण रस्ते १४५८७९ किलोमीटरचे आहेत. २०१४च्या तुलनेत २०१५मध्ये विमानाची प्रवासी आणि मालवाहतूक वाढली.

११ कोटी मोबाइल!
राज्यात तब्बल ११ कोटी ५९ हजार मोबाइल जोडण्या आहेत. गेल्या एक वर्षात ही संख्या ६६ लाखाने वाढली. २०१४मध्ये ही संख्या १० कोटी ३४ लाख इतकी होती. टेलिफोनची संख्या मात्र घटली. २०१३-१४मध्ये ५३ लाख ७४ हजार टेलिफोन जोडण्या होत्या. आज हा आकडा
५१.११ लाख इतका आहे.

Web Title: 2.70 crore vehicles in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.