मांगीतुंगी पर्यटनस्थळ विकासासाठी २७५ कोटी - मुख्यमंत्री फडणवीस

By admin | Published: February 16, 2016 10:25 PM2016-02-16T22:25:30+5:302016-02-17T01:13:55+5:30

छत्रपती शिवराय यांनी मैदानी लढाई जिंकल्याची साक्ष असणारा साल्हेरचा किल्ला याचा विचार करून राज्य शासनाने या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी २७५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

275 crores for development of Mangiguri tourist destination - Chief Minister Fadnavis | मांगीतुंगी पर्यटनस्थळ विकासासाठी २७५ कोटी - मुख्यमंत्री फडणवीस

मांगीतुंगी पर्यटनस्थळ विकासासाठी २७५ कोटी - मुख्यमंत्री फडणवीस

Next

पंचकल्याणक सोहळ्यात दिली अंमलबजावणीची ग्वाही

नाशिक : जैन धर्मियांचे धर्मस्थळ असलेले मांगीतुंगी आणि छत्रपती शिवराय यांनी मैदानी लढाई जिंकल्याची साक्ष असणारा साल्हेरचा किल्ला याचा विचार करून राज्य शासनाने या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी २७५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले प्रथम तीर्थंकर भगवान वृषभदेव हे आदर्श शासक असल्याने ते आजही शासकांना मार्गदर्शक आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मांगीतुंगी येथे उभारलेल्या भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट उंच मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार सुभाष भामरे, आमदार राजेंद्र पाटणी, दीपिका चव्हाण, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, माजी खासदार जे. के. जैन, श्री ज्ञानामती माताजी, चंदनामाताजी, रवींद्रकीर्ती स्वामी, अनेकांतसागर तसेच डॉ. पन्नालाल पापडीवाल, संजय पापडीवाल, सुमेरकुमार काले, वर्धमान पांडे, जीवन प्रकाश जैन, चंद्रशेखर कासलीवाल, सुवर्णा काले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जे. के. जैन यांनी प्रास्ताविक केले. भगवान वृषभदेव हे उत्कृष्ट शासक, कृषीपंडित, गणितज्ज्ञ, धन्वंतरी, साहित्य कला क्षेत्राचे जाणकार होते. त्यांच्या काळात सर्वांना विकासाची समान संधी होती. प्रजेचे पालनपोषण कसे करावे, याचा आदर्श त्यांनी प्रस्थापित केला होता. त्यामुळे उच्चपदस्थांपासून गावातील सरपंचापर्यंत सर्वांना भगवान वृषभदेव यांच्या जीवनातून शिक्षा आणि दीक्षा घेण्यासारखी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. भगवान वृषभदेव यांची केवळ १०८ फूट उंच मूर्ती नसून जैन धर्मियांच्या मूल्यांची सर्वाेच्च स्थानी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, अशा भावना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. खासदार सुभाष भामरे यांनी मांगीतुंगीचा पर्यटनस्थळ विकसित व्हावा, अशी मागणी केली. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी मनोगत व्यक्त केले. 

 मांगीतुंगी येथे साकारण्यात आलेल्या मूर्तीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्र्यांनी हेलीकॉप्टरद्वारे हवाई पाहणी केली. * मांगीतुंगी येथील जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे भाजपाचे माजी आमदार (कै.) जयचंद कासलीवाल यांचे सुपुत्र व चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल आणि मूर्ती साकारण्यासाठी शिल्पकार सी. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. * भगवान वृषभदेव यांच्या पंचकल्याणक महोत्सवांतर्गत केवल ज्ञान दीक्षेचा कार्यक्रम संपन्न झाला. * भगवान वृषभदेवाची सर्वात उंच मूर्ती साकारण्यात आल्याने मांगीतुंगीचा वेगळा परिचय जगाला होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर विशेष बोधचिन्हाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 

फडणवीसांना ‘धर्म राजेश्वर’ पदवी प्रदान शासनाच्या अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नसताना या पंचकल्याणक सोहळ््यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी तातडीने १९ कोटी रुपयांची कामे करण्याचे आदेश दिले. ही विकास कामे तातडीने झाल्याबद्दल जैन बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात आले. आमदार राजेंद्र पाटणी यांनी इतक्या द्रुतगतीने कोणत्या सरकारने अशाप्रकारे कार्यवाही केल्याचे हे प्रथम उदाहरण असल्याचे सांगितले. त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘धर्म राजेश्वर’ ही पदवी प्रदान करण्यात आली. फडणवीस यांना धर्माचार्यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. 

नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी येथे भगवान वृषभदेव मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी दिप प्रज्वलन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. समवेत संजय पापडीवाल, विजय जैन, जीवन प्रकाश जैन, स्वाधीन क्षत्रिय, खासदार डॉ. सुभाष भामरे, सुरेश जैन, जे.के. जैन, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे,स्वामी रविंद्रकिर्ती आदी.

 

Web Title: 275 crores for development of Mangiguri tourist destination - Chief Minister Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.