28 जिल्ह्यांमध्ये अद्यापही पावसाची तूट
By admin | Published: August 5, 2014 03:13 AM2014-08-05T03:13:04+5:302014-08-05T03:13:04+5:30
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली तूट जुलै महिन्यातील मुसळधार पावसाने ब:यापैकी भरून काढली आहे.
Next
पुणो : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली तूट जुलै महिन्यातील मुसळधार पावसाने ब:यापैकी भरून काढली आहे. जून आणि जुलै महिन्यांत राज्यात सरासरीच्या 79 टक्के पाऊस पडला आहे. मात्र, तरीही जिल्हानिहाय विचार करता 28 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भावरील दुष्काळी ढग सरत असताना मराठवाडय़ावर दुष्काळी छाया कायम आहे.
आधीच मान्सून उशिरा दाखल झाला आणि त्यानंतर पावसाने जून महिन्यात दडीच मारल्याने राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. पण, जवळपास संपूर्ण जुलै महिना राज्यात मान्सून सक्रिय होता. त्यामुळे मराठवाडा वगळता राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. या पावसाने या भागांमधील दुष्काळाची छाया पुसत आणली आहे. आठवडाभरापूर्वी केवळ विदर्भ सरासरीच्या जवळ पोहोचला होता. पण, जुलैच्या अखेरीस कोकणाने विदर्भाला मागे टाकले. कोकणात सरासरीच्या 85 टक्के पाऊस झाला आहे. विदर्भात सरासरीच्या 84 टक्के पाऊस झाला. त्यामुळे विदर्भ आणि कोकण ‘नॉर्मल’ झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 79 टक्के पाऊस झाला आहे. (प्रतिनिधी)
च्मुंबई उपनगरांत सर्वाधिक पाऊस झाला आहे. तेथे सरासरीच्या 17 टक्के जास्त पाऊस झाला. त्यापाठोपाठ गोंदियात सरासरीच्या 14 टक्के, अमरावतीत 13 टक्के, वध्र्यात 8 टक्के, नागपूर जिल्ह्यात 6 टक्के आणि मुंबईमध्ये सरासरीच्या 5 टक्के जास्त पाऊस पडला आहे.
सर्वात कमी पाऊस हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत
राज्यात सर्वात कमी पाऊस हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये पडला आहे. हिंगोलीत सरासरीच्या 75 टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यात 71 टक्के, परभणी जिल्ह्यात 68 टक्के, जालना जिल्ह्यात 6क् टक्के, बीड जिल्ह्यात 51 टक्के पाऊस कमी पडला आहे.
मराठवाडय़ात केवळ 42 टक्केच पाऊस
च्मराठवाडय़ात सरासरीच्या केवळ 42 टक्केच पाऊस पडला आहे. यावरून जूनपाठोपाठ जुलै महिनाही मराठवाडय़ात कोरडा गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑगस्ट महिन्यात जर इथे पाऊस पडला नाहीतर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची भीती आहे.