वाळीत प्रकरणी तेलंगे येथील २८ जणांना अटक
By admin | Published: December 6, 2014 02:45 AM2014-12-06T02:45:10+5:302014-12-06T02:45:10+5:30
मुंबईतील खोली गावकीच्या नावावर करण्यासाठी एका वृद्ध दांपत्यावर दबाव आणि त्यांना वाळीत टाकल्याप्रकरणी तेलंगे येथील अठ्ठावीस जणांना ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली.
महाड : मुंबईतील खोली गावकीच्या नावावर करण्यासाठी एका वृद्ध दांपत्यावर दबाव आणि त्यांना वाळीत टाकल्याप्रकरणी तेलंगे येथील अठ्ठावीस जणांना ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली.
महाड तालुक्यातील तेलंगे खैरांडेवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या शांताराम वनगुते आणि सुभद्रा वनगुते या वृद्ध दांपत्याच्या मालकांची मुंबईतील दादर येथील खोली सन्मित्र मित्र मंडळ या गावकीच्या मंडळाच्या नावावर करून घेण्यासाठी या वृद्ध दांपत्यावर मुंबईकर ग्रामस्थ दबाव टाकीत होते. याबाबत वनगुते यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली.
या तक्रारीनुसार पोलिसांनी २९ जणांपैकी २८ जणांना अटक केली. बाळकृष्ण राणे, सचिन बाळकृष्ण राणे, रामदास राणे, भिकू धाडवे, रवींद्र धाडवे, संजीवन राणे, सूर्यकांत निवाते, बाजी राणे, सूर्यकांत राणे, अशोक निवाते, यशवंत वनगुते, विनायक दवंडे, नरेंद्र धाडवे, दिलीप राणे, संतोष राणे, शांताराम धाडवे, प्रकाश धाडवे, संदीप राणे, अनंत दवडे, सुरेश तुकाराम राणे, दाजी राणे, धोंडू राणे, विजय राणे, जगन वनगुते, गणपत धाडवे, चंद्रकांत धाडवे अशी त्यांंची नावे आहेत. त्यांच्यावर भादंवि कलम ३८५, ३८७, १२० (ब), १५३(ख) ५०६ अन्वये कारवाई करण्यात येत आहे. (वार्ताहर)