२८ प्रकल्पांचे एकाचवेळी ई-भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 02:02 AM2017-04-14T02:02:00+5:302017-04-14T02:02:00+5:30

राज्याचा विकास दर हा शहरांच्या विकासावर अवलंबून असल्याने तो अधिकाधिक वाढण्यासाठी नागरीकांना चांगले राहणीमान व गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी

28 projects simultaneously e-Bhoomipujan | २८ प्रकल्पांचे एकाचवेळी ई-भूमिपूजन

२८ प्रकल्पांचे एकाचवेळी ई-भूमिपूजन

Next

मुंबई : राज्याचा विकास दर हा शहरांच्या विकासावर अवलंबून असल्याने तो अधिकाधिक वाढण्यासाठी नागरीकांना चांगले राहणीमान व गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी स्वच्छ शहरांची निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
अमृत व नगरोत्थान अभियानातंर्गत राज्यातील २८ शहरांमध्ये १ हजार ६२२ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपुजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थानी झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्यास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खा. सदाशिव लोखंडे, आ.सुनील तटकरे, विनायकराव जाधव पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शहरांचा नियोजनबध्द विकास होण्यासाठी यापुढे शहरांतील बांधकामांचे नकाशे डिजिटल पध्दतीने मंजूर करण्यात येतील. शहरांमधील कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण होण्यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. कामांची गुणवत्ता न राखल्यास संबंधितांवर कारवाई करण्यास शासन मागेपुढे पाहणार नाही,असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. (विशेष प्रतिनिधी)

हे आहेत प्रकल्प
नाशिक मलनिस्सारण योजना. हिंगणघाट, अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, इचलकरंजी, अकोला, जळगाव, यवतमाळ येथील पाणी पुरवठा योजना असे ८ शहरांमधील एकूण ८२६.७२ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे ई-भूमिपूजन केले.

Web Title: 28 projects simultaneously e-Bhoomipujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.