प्रधानमंत्री योजनेत राज्यात २,८०९ कि.मी. रस्ते होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 06:13 AM2021-08-11T06:13:51+5:302021-08-11T06:14:06+5:30
२,०९२ कोटी रुपयांतून होणार ४१४ रस्ते
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेत (पीएमजीएसवाय) महाराष्ट्रात २,८०९ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांना मंजूरी दिली गेली आहे. या कामासाठी २,०९२.३६ कोटी रूपये खर्च येईल.
शिवसेनेचे हेमंत पाटील आणि भाजपचे रामदास तड़स यांनी विचारलेल्या प्रश्नाला लोकसभेत लेखी उत्तर देताना ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, पीएमजीएसवाय योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासाठी एकूण ४१४ रस्त्यांना मंजूरी दिली गेली आहे. त्यांची एकूण लांबी २,८०९.३७ किलोमीटर आहे. यात सर्वात जास्त १७२.६ कोटी रूपयांत २२७.६५ किलोमीटर लांबीचे ३४ सोलापूर जिल्ह्यात रस्ते बनवले जातील. अमरावतीत १२९.७ कोटी रूपयांत १८०.१३ किलोमीटरचे २८ आणि नांदेड जिल्ह्यात १३२.२८ कोटी रूपये खर्चात १७३.९२ किलोमीटरचे २४ रस्ते मंजूर केले गेले आहेत. १३६.८५ कोटी रूपयांतून १६९.१६ किलोमीटरचे दोन रस्ते नागपूर आणि १२४.७ कोटी रूपयांतून १६७.१ किलोमीटरचे २७ रस्ते गोंदिया जिल्ह्यात बनवले जातील, धुळे जिल्ह्यात ९.९४ कोटी रूपये खर्चातून १५.८५ किलोमीटरचा फक्त एक रस्ता मंजूर केला गेला आहे.
अनुपालनानंतरच काम मंजूर
निरंजन ज्योती म्हणाल्या की, पीएमजीएसवायअंतर्गत रस्त्यांना निर्धारित दिशानिर्देशांनुसार मंजूरी दिली जाते. राज्यांच्या विस्तृत परियोजनेचा अहवाल तपासून दुरुस्त्या राज्यांना पाठवल्या जातात. त्यांच्या अनुपालनानंतरच काम मंजूर केले जाते.