राज्यात तब्बल 2.83 कोटी वाहने
By admin | Published: June 5, 2014 01:26 AM2014-06-05T01:26:38+5:302014-06-05T01:26:38+5:30
महाराष्ट्रात वाहनांची संख्या आहे तब्बल 22 कोटी 83 लाख 39 हजार 65क्. विधिमंडळात आज सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
Next
>मुंबई : 11 कोटी 24 लाख इतकी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात वाहनांची संख्या आहे तब्बल 22 कोटी 83 लाख 39 हजार 65क्. विधिमंडळात आज सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
आजपासून 43 वर्षापूर्वी म्हणजे 1971 मध्ये महाराष्ट्रात लहानमोठी वाहने होती केवळ 3 लाख 11 हजार 669. 2क्13 मध्ये हा आकडा पोहोचला 2 कोटी 8 लाख 72 हजार 1क्क् वर. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात 19 लाख 67 हजार 55क् वाहने वाढली.
दर लाख लोकसंख्येमागे 1971 मध्ये वाहनांची संख्या फक्त 618 होती. ती आता 2क् हजार 5क्4 इतकी आहे. दर लाख लोकसंख्येमागे तेव्हा क्.9 इतक्याच रुग्णवाहिका होत्या. आज हे प्रमाण 1क्.7 इतके आहे. मोटार सायकली, स्कूटर आणि मोपेड यांची आजची संख्या 1 कोटी 64 लाख 18 हजार 9क्8 इतकी आहे. आजपासून 45 वर्षापूर्वी ती फक्त 83 हजार 93क् इतकी होती. राज्यात 2क्13च्या आकडेवारीनुसार 2 लाख 43 हजार 172 किलोमीटरचे रस्ते होते. 12 वर्षापूर्वी सन 2क्क्क्-क्1 मध्ये 2 लाख 16 हजार 946 किलोमीटरचे रस्ते होते. याचा अर्थ 12 वर्षात 26 हजार 226 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्र देशा, मोबाइलच्या देशा
राज्यात आजमितीस तब्बल 9 कोटी 79 लाख मोबाइल सेट्स आहेत. दूरध्वनी कनेक्शनची संख्या आहे 54 लाख 21 हजार. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत मोबाइलची संख्या 8 हजारांनी कमी झाली.