कोकणातील पाच जिल्ह्यांना २८४३ कोटी, आपत्ती निवारणासाठी निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 05:30 AM2023-02-22T05:30:32+5:302023-02-22T05:31:06+5:30

गेल्या अडीच वर्षातील सरकारने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी कुठलाच निधी दिला नव्हता.

2843 crores to five districts of Konkan, sanctioned funds for disaster relief | कोकणातील पाच जिल्ह्यांना २८४३ कोटी, आपत्ती निवारणासाठी निधी मंजूर

कोकणातील पाच जिल्ह्यांना २८४३ कोटी, आपत्ती निवारणासाठी निधी मंजूर

googlenewsNext

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांसाठी २,८४३ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यात ठाणे १८८ कोटी, पालघर २८३ कोटी, रायगड ९९६, रत्नागिरी ७०० कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६७७ कोटी यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 

सामंत म्हणाले, गेल्या अडीच वर्षातील सरकारने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी कुठलाच निधी दिला नव्हता. मात्र आता कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आपत्ती निवारणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. रायगड जिल्ह्याला मिळालेल्या ९९६ कोटींपैकी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी १५० कोटी, बहुउद्देशीय निवारा केंद्रासाठी १५०, भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी ७०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेल्या निधीतून ही तीन प्रमुख कामे करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

डीपीडीसीचा निधी 
मंत्री सामंत म्हणाले की, यावर्षीचा नियतव्ययही वाढवून तो ३०० कोटींवर नेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ९ कोटी नगरविकासासाठी वाढवून दिले आहेत. त्यामुळे डीपीडीसीचे पैसे वाढले आहेत. या व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्याला आपत्कालीन निवारणासाठी ८०० रुपयांचा स्वतंत्र निधी मिळाला असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Web Title: 2843 crores to five districts of Konkan, sanctioned funds for disaster relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :konkanकोकण