मुंबई विमानतळावर 29 लाखांची सोन्याची बिस्किटं जप्त

By Admin | Published: January 11, 2017 04:16 PM2017-01-11T16:16:11+5:302017-01-11T16:16:11+5:30

मुंबई विमानतळावर 29 लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. कस्टमच्या अधिका-यांनी ही कारवाई केली आहे.

29 lakh gold biscuits seized in Mumbai airport | मुंबई विमानतळावर 29 लाखांची सोन्याची बिस्किटं जप्त

मुंबई विमानतळावर 29 लाखांची सोन्याची बिस्किटं जप्त

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 - मुंबई विमानतळावर 29 लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. मुंबई विमानतळावर कस्टमच्या अधिका-यांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाला अटकदेखील करण्यात आली आहे. रियाधहून मुंबईकडे येणा-या एका प्रवाशाकडे 1160 ग्रॅम वजनाची 10 सोन्याची बिस्किटे आढळून आली. 
 
मोहम्मद अल्ताफ मोईदिन असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सौदी अरेबियातील रियाधहून आलेले जेट एअरवेजचे विमान मुंबई विमानतळावर उतरले होते.  त्यानंतर हे विमान मंगळुरूला जाणार होते. यापूर्वी कस्टमच्या अधिका-यांनी केलेल्या तपासणीत मोहम्मद अल्ताफ मोईदिनकडे 29 लाख रुपयांची आढळून आलेली सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली. 
 

Web Title: 29 lakh gold biscuits seized in Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.