लोणावळ्यात तीन दिवसात ६३७ मिमी पाऊस
By admin | Published: July 4, 2016 10:04 AM2016-07-04T10:04:09+5:302016-07-04T10:04:39+5:30
शुक्रवारी रात्रीपासून लोणावळा शहरात सक्रिय झालेला पाऊस उसंत घेण्यास तयार नसल्याने शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसात शहरात तब्बल ६३७ मिमी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. ४ - शुक्रवारी रात्रीपासून लोणावळा शहरात सक्रिय झालेला पाऊस उसंत घेण्यास तयार नसल्याने शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसात शहरात तब्बल ६३७ मिमी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. घाटमार्थ्यावर लोणावळा शहर असल्याने शहरात थोडा जरी पाऊस कमी झाला तरी पाणी वाहून जात आल्याने अद्याप तरी शहराला पुराच्या संकटाचा धोका नसला तरी पुढिल काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता यंत्रणांनी वर्तवली आहे.
लोणावळा शहरात गत २४ तासात तब्बल २६० मिमी पाऊस झाला आहे. लोणावळ्यात आज अखेर पर्यत ९३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यत १२३८ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी जुन महिन्यात लोणावळ्यात जेमतेम पाऊस झाल्याने नागरिक पावसाची अतुरतेने वाट पहात होते. जुलैच्या १ तारखेलाच मान्सुन शहेात सक्रिय झाला असून जोरदार कोसळणार्या सरींमुळे तिनच दिवसात जनजिवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली असून काही भागात सिंमाभिंती पडल्या आहेत. सकल भागात तसेच गटारे गायब झालेल्या रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्रही शहरात पहायला मिळत आहे.