लंडनमध्ये शुक्रवारपासून ३ दिवस मराठी संमेलन

By admin | Published: June 1, 2017 01:07 AM2017-06-01T01:07:07+5:302017-06-01T01:07:07+5:30

महाराष्ट्र मंडळ, लंडनच्या ८५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने २ ते ४ जून या काळात लंडन मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत

3 days Marathi session from London on Friday | लंडनमध्ये शुक्रवारपासून ३ दिवस मराठी संमेलन

लंडनमध्ये शुक्रवारपासून ३ दिवस मराठी संमेलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लंडन : महाराष्ट्र मंडळ, लंडनच्या ८५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने २ ते ४ जून या काळात लंडन मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून, जगभर पसरलेल्या महाराष्ट्रीयनांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने हा मोठा पुढाकार आहे.
लंडनमधील कॅनडा स्क्वेअरच्या कॅनरी व्हर्फ येथे ३९ व्या मजल्यावर होणाऱ्या या संमेलनात भारताबरोबरच ब्रिटनमधील मंत्री व प्रतिष्ठित उद्योजकही सहभागी होणार आहेत. इंग्लंडच्या प्रादेशिक सैन्याचे कमोदोर डेव्हिड एल्फोर्ड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मराठी माणसाचे यश, सिद्धी आणि भरभराट साजरा करण्यासाठी होणाऱ्या या संमेलनात कौशल्य, संगीत, कला, सर्जनशीलता यांचे दर्शन घडेल. दुबई, अमेरिका, भारत व अन्य देशांतील मराठी उद्योजकांचा सत्काराबरोबरच संगीत, विनोद असे कार्यक्रम तर असतीलच, शिवाय स्वादिष्ट मराठी जेवण व विविध क्षेत्रांत स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या ३३ मराठी नामवंतांशी गप्पांचाही कार्यक्रम असेल. जन्मभूमीची जाणीव रुजविणे, मराठी माणसांना एकत्र आणणे, मराठी संस्कृतीचा पेटारा पुन्हा उलगडणे आणि येणाऱ्या पिढीला मी मराठी असल्याची जाणीव करून देणे, हे या संमेलनाचे उद्दिष्ट आहे.  

अनेक मराठी तारे-तारकांची उपस्थिती

सयाजी शिंदे, मोहन आगाशे, भार्गवी चिरमुले, नंदेश उमप, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, समीर चौगुले, सिद्धार्थ कदम हे या संमेलनाला हजर राहणार असून, स्थानिक कलाकारांचे विविध कार्यक्रमही तिथे होतील.
क्रूझमधून टेम्स नदीची सफर हा कार्यक्रम आणि या गोजिरवाण्या घरात या नाटकाचा प्रयोग हेही संमेलनाचे वैशिष्ट्य असेल. युरोप व इंग्लंडमधून १३00 मराठी लोक संमेलनाला येणार आहेत.

Web Title: 3 days Marathi session from London on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.