पुणे-बंगळुरू महामार्गावर बसला भीषण अपघात, ३ ठार

By Admin | Published: December 21, 2015 09:56 AM2015-12-21T09:56:00+5:302015-12-21T09:57:12+5:30

पुणे- बंगळुरू महामार्गावर एका खासगी बस डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात ३ ठार तर ७ जखमी झाले.

3 dead in a bus accident on Pune-Bangalore highway | पुणे-बंगळुरू महामार्गावर बसला भीषण अपघात, ३ ठार

पुणे-बंगळुरू महामार्गावर बसला भीषण अपघात, ३ ठार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. २१ - पुणे- बंगळुरू महामार्गावर एका खासगी बसला झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार तर ७ जण जखमी झाले आहेत. मुंबईहून इचलकंरजीच्या दिशेने जाणा-या एका खासगी ट्रॅव्हल्सची बस सांगली-पुणे-बंगळुरू महामार्गावर नेर्लेनजीक भिवर्गी मळा येथील दुभाजकाला धडकून उलटली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडरला धडकून हा अपघात झाला. या अपघातात ३ जण ठार तर ७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर राजारामबापू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Web Title: 3 dead in a bus accident on Pune-Bangalore highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.