राज्य मंत्रिमंडळाचे ३ महत्त्वपूर्ण निर्णय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 03:07 PM2022-05-26T15:07:49+5:302022-05-26T15:56:52+5:30

नवी मुंबई येथील केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर 37, मधील 3500.00 चौ.मी.क्षेत्रफळाचा हा भूखंड विशेष बाब म्हणून नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन विभागास देण्यात येणार आहे.

3 important decisions of the state cabinet; CM Uddhav Thackeray's appeal to the people to wear mask | राज्य मंत्रिमंडळाचे ३ महत्त्वपूर्ण निर्णय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

राज्य मंत्रिमंडळाचे ३ महत्त्वपूर्ण निर्णय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

Next

मुंबई - छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37, मधील 3 हजार 500 चौ.मी.क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या बैठकीत राज्य सरकारने ३ महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्याचसोबत कोरोना परिस्थितीवरून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.

राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे. सारथी संस्थेमार्फत राज्यातील पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर,अमरावती व मुंबई येथे विभागीय कार्यालय, वसतिगृहे, अभ्यासिका व ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र, जेष्ठ नागरीक समुपदेशन कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र इ. सुविधा विकसीत करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी ५०० मुलांचे व ५०० मुलींचे स्वतंत्र निवासी वसतीगृह देखील विकसित करण्यात येईल. याअंतर्गत नवी मुंबई येथील केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर 37, मधील 3500.00 चौ.मी.क्षेत्रफळाचा हा भूखंड विशेष बाब म्हणून नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन विभागास देण्यात येणार आहे.

४०१ टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरु

राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात २५ मे अखेर ३६.६८ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या याच काळात हे प्रमाण ३६.२७ टक्के एवढे होते. तसेच राज्यातील टंचाईग्रस्त भागात ४०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठ्यासाठी शासन जलसाठयाचे नियोजन करत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठ्याचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपायोजना राबविण्यात येत आहेत. सध्या राज्यात धरणातील जलसाठ्याचा विचार करता अमरावती विभागात १९२४ दशलक्ष घनमीटर म्हणजे विभागाच्या एकूण साठ्याच्या ४७.२२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

तसेच टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. याअंतर्गत टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना आवश्यकतेनुसार टँकर्सद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यात कोकण विभागात १५५ गावांना आणि ४९९ वाड्यांना १०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात ११७ गावे, १९९ वाड्यांना १०२ टँकर्स, पुणे विभागात ७१ गावे आणि ३६० वाड्यांना ७० टँकर्स, औरंगाबाद विभागात ४३ गावे, २३ वाड्यांना ५९ टँकर्स, अमरावती विभागात ६९ गावांना ६९ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागात मे महिन्याअखेरीस देखील टँकर्सची आवश्यकता भासलेली नाही. 

हरभऱ्याची खरेदी 28 जूनपर्यंत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरु

या हंगामात हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात वाढ झाली असून ३२.८३ लाख मे. टन अपेक्षित उत्पादन असताना ८.२० लाख मे. टन एवढे वाढीव उत्पादन होत आहे. यामुळे हरभऱ्याची खरेदी २८ जून २०२२ पर्यंत वाढविण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. हरभऱ्याच्या खरेदीचा अंतिम दिनांक २९ मे २०२२ असून ही तारीख वाढविण्यास एक-दोन दिवसात मंजूरी अपेक्षित आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाला सांगितले.  सध्या हरभऱ्याचे बाजारभाव ४५००-४८०० रुपये प्रती क्विंटल आहे. गेल्या हंगामात हरभऱ्याच्या लागवडीखालील क्षेत्र २२.३१ लाख हेक्टर व एकूण उत्पादन २३.९७ लाख मे. टन इतके होते. सध्या सरासरी एकरी उत्पादन ११५८ क्विंटल प्रती हेक्टर असे आहे.

कोरोना वाढतोय, मास्क वापरा

कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी १.५९ टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळते.   मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये २७.९२ टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात १८.५२ टक्के ६८.७५ टक्के इतकी वाढ झाली आहे. 

Web Title: 3 important decisions of the state cabinet; CM Uddhav Thackeray's appeal to the people to wear mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.