राज्यातील ३६ लाख विद्यार्थ्यांना अद्याप गणवेशच नाही; केवळ ७ लाख विद्यार्थ्यांना केले वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 01:23 PM2024-08-15T13:23:55+5:302024-08-15T13:26:21+5:30

राज्यात ४३ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे लक्ष्य

3 lakh 60 thousand students in the Maharashtra still do not have uniform Distributed to only 7 lakh students | राज्यातील ३६ लाख विद्यार्थ्यांना अद्याप गणवेशच नाही; केवळ ७ लाख विद्यार्थ्यांना केले वाटप

राज्यातील ३६ लाख विद्यार्थ्यांना अद्याप गणवेशच नाही; केवळ ७ लाख विद्यार्थ्यांना केले वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत गणवेशाची घोषणा केली, परंतु भारतीय स्वातंत्र्य दिन एक दिवसावर आला, तरी राज्यातील सुमारे ३६ लाख ४१ हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नाही. मोजक्या जिल्ह्यात केवळ ७ लाख मुलांना वाटप झाले, तर काही जिल्ह्यांत कापड वाटप आले असून, गणवेशच तयार नसल्याचे चित्र आहे.

पुणे, रत्नागिरी, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला, लातूर, धाराशीव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर, रायगड, धुळे, नाशिक या जिल्ह्यांतील मुलांना अद्याप एकही गणवेश वाटप झालेला नाही. राज्यात ४३ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे लक्ष्य असून, केवळ ७ लाख १३ हजार ६०० मुलांना वाटप करण्यात आले आहे.

जिल्हा - एकूण विद्यार्थी - गणवेश वाटप

  • कोल्हापूर    १,८३,४६४    १,६८,००८
  • सातारा    १,३०,७४५     १,३०,७४५
  • सांगली    १,२६,३२५    १,१७०००
  • बीड    १,५४,७४८    ७७,२५६
  • ठाणे    ८०,२४४    ६७,४८१
  • यवतमाळ    १,७१,५४४    ४९,७०९
  • अहमदनगर    २,०२१,०३४    ३७,६७४
  • पालघर    १,६६,९९२    ३४,०००
  • सिंधुदुर्ग    ३१,८७२    १४,६९३
  • नंदुरबार    ९६,९५२    ११,०००
  • जळगाव    १,८२,१८५    ९,९७४
  • नागपूर    ७८,४६०    ५,७९०
  • छ. संभाजीनगर    २,१०,३०७    २५३
  • धुळे    ८७,२२४    ००
  • रायगड    १,५०,२६४    ००
  • नाशिक    २,०६२,५१२    ००
  • सोलापूर    २,०७०,००    ००
  • नांदेड    १,८८०००    ००
  • हिंगोली    ७२,३०९    ००
  • परभणी    १,१७,३०२    ००
  • जालना    १,४२,७९८    ००
  • धाराशिव    १,०२,०४१    ००
  • लातूर    १,०५,१४१    ००
  • अकाेला    ७०,३९५    ००
  • बुलढाणा    १,५६,५२५    ००
  • वाशिम    ६८,६०७    ०० 
  • अमरावती    १,२०,५४७    ०० 
  • गोंदिया    ७६,७९१    ०० 
  • वर्धा    ४९,५५९    ०० 
  • गडचिरोली    ६८,२७६    ०० 
  • भंडारा    ६१,५८३    ०० 
  • चंद्रपूर    १,०२,४२५    ०० 
  • रत्नागिरी    ७०,५५१    ०० 
  • पुणे    २,४०,४५४    ००

एकूण विद्यार्थी    ४३,५५,२१६    ७,१३,६०९

Web Title: 3 lakh 60 thousand students in the Maharashtra still do not have uniform Distributed to only 7 lakh students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.